Full Width(True/False)

'हे' सर्च इंजिन इतरांप्रमाणे तुमची वैयक्तिक माहिती रेकॉर्ड करत नाही, लगेच डिटेल्स पाहा

नवी दिल्ली : Search Engine आणि वेब ब्राउझरच्या बाबतीत Google सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. हे जलद, स्मूथ असून स्वस्त ते महागड्या स्मार्टफोनपर्यंत कोणत्याही डिव्हाइसवर सहजतेने चालते. पण, Google Search आणि गोपनीयतेच्या बाबतीत मात्र मागे आहेत. तुम्ही गुगलवर जे काही सर्च करता ते गुगल स्टोअर करते. वाचा: Google क्रोम ब्राउझरमध्ये देखील अशी एक प्रणाली आहे जी तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटचा डेटा संग्रहित करते. Google च्या कमाईचा मोठा भाग जाहिरातींमधून येतो, त्यामुळे कंपनी डेटा साठवून पैसे कमवते. पण, जर तुम्हाला कोणालाही कळविल्याशिवाय काही शोधायचे असेल किंवा खाजगी शोध घ्यायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही यासाठी एक चांगला पर्याय वापरू शकता आणि खाजगी राहून शोध आणि ब्राउझ करू शकता. Go नावाचे एक लोकप्रिय गोपनीयता केंद्रित सर्च इंजिन आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जे काही शोधत आहात त्याचा डेटा कोणाकडे जाणार नाही याची कंपनी खात्री करते. म्हणूनच कंपनी तुमचा डेटा अजिबात साठवत नाही. गुगलप्रमाणे सर्च करताना इथे तुम्हाला वैयक्तिकृत सूचना मिळणार नाहीत. तुम्हाला हवे ते तुम्ही सर्च करत असतांना ,हे ब्राउझर तुम्हाला स्वतःहून कोणतीही सूचना देत नाही, ज्या प्रकारे तो गुगल आणि गुगल क्रोममध्ये असते. DuckDuck Go मध्ये Google Chrome विस्तार देखील आहे. जो, आपण Google Chrome मध्ये जोडू शकता आणि गोपनीयतेसह ब्राउझ करू शकता. iPhone वरील अॅप स्टोअरवरून अँड्रॉइड स्मार्टफोनवरील गुगल प्ले स्टोअरवरून ते डाऊनलोड करता येते. Google आणि इतर कंपन्या ज्या प्रकारे युजर्सचा मागोवा घेतात त्याप्रमाणे DuckDuck कधीही ट्रॅक करत नाही असा कंपनीचा दावा आहे. तुम्ही याचा वापर करून जाहिराती टाळू शकता. तसेच, तुमच्या माहितीचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट देखील टाळू शकता. या कंपनीचा असाही दावा आहे की युजर्सची वैयक्तिक माहिती साठवली जात नाही. तुम्ही हे Search Engine म्हणून देखील वापरू शकता आणि ब्राउझरमध्ये विस्तार स्थापित करून देखील वापरू शकता. वाचा: वाचा: वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iKmxA5