Full Width(True/False)

कन्फर्म! या दिवशी भारतात येतोय Moto E40, पाहा फोनची फीचर्स

नवी दिल्लीः Motorola कंपनी भारतात लागोपाठ आपले नवीन स्मार्टफोन्स आणि टेबलेट्सला लाँच करीत आहे. ही कंपनी युजर्संना आकर्षित करण्यासाठी अनेक दमदार फीचर्स सोबत आपले प्रोडक्ट्स लाँच करीत आहे. आता ही माहिती समोर येत आहे की, भारतीय मार्केटमध्ये ला लाँच केले जाणार आहे. या फोनला १२ ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. या फोनच्या उपलब्धतेसंबंधी ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart टीज करण्यात आले आहे. या फोनच्या काही फीचर्सला कन्फर्म करण्यात आले आहे. ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा, 5000 एमएएच ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट, ४ जीबी रॅम सारखे फीचर्स दिले आहेत. Motorola ने घोषणा केली आहे की, Moto E40 १२ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. फोनला फ्लिपकार्टवर टीज करण्यात आले आहे. या फोनमध्ये पंच होल डिझाइन, 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 400 निट्स पीक ब्राइटनेस दिली जाणार आहे. सोबत फोन 1.8GHz ची क्लॉक स्पीड सोबत Unisoc T700 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम दिली जाणार आहे. ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले जाणार आहे. याचे स्टोरेज १ टीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये गूगल अस्सिटेंट आणि 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. Moto E40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार असून यात प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. सोबत डेप्थ आणि मायक्रो व्हिजन सेन्सर दिला जाणार आहे. फोन फेस अनलॉक सोबत रियर फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येईल. हे IP52 रेटिंग सोबत येईल. या फोनमध्ये लेटेस्ट स्टॉक एंड्रॉइड 11 सॉफ्टवेयर दिले जाणार आहे. Moto E40 पिंक क्ले आणि कार्बन ग्रे कलर मध्ये लॉन्च केले जाणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/308Vb0b