नवी दिल्ली : या वर्षाखेर आपल्या १५ कोटी यूजर्ससाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन सिस्टममध्ये ऑटो-एनरोल फीचर देणार आहे. 2FA/2SV सह अॅप उघडल्यावर पासवर्ड टाकताना यूजरला आपल्या पर्सनल डिव्हाइसवर एक अपडेटेड वन टाइम कोडसह मेसेज येईल. याचा उपयोग व्हेरिफिकेशनसाठी होईल. म्हणजेच, प्रत्येक डिव्हाइसमध्ये डिफॉल्ट स्वरुपात मिळेल. वाचा: कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, वर्ष २०२१ अखेर १५० मिलियन यूजर्ससाठी ऑटो-एनरोल रोल आउट करणार आहे. २ मिलियन युट्यूब क्रिएटर्ससाठी देखील फीचर उपलब्ध होईल. गुगलचे म्हणणे आहे की, टू-स्टेप व्हेरिफिकेशन ही अकाउंट्स व नेटवर्कपर्यंत अनाधिकृत अॅक्सेसला रोखण्याची सर्वात विश्वासू पद्धत आहे. कंपनीने मे महिन्यापासून यूजर्सला टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टममध्ये ऑटो-एनरोल करण्यास सुरुवात केली होती. आयओएस यूजर्स इतर अॅप्ससाठी पासवर्ड आपोआप भरण्यासाठी क्रोमचा उपयोग करु शकतात. गुगलचे म्हणणे आहे की, लवकरच कोणत्याही आयओएस अॅपसाठी क्रोमच्या पासवर्ड जनरेशन टूलचा वापर करता येईल. कंपनीनुसार, सध्या पर्याय सर्वांसाठीच उपयोगी नाही. त्यामुळे आम्ही अशा टेक्नोलॉजीवर काम करत आहोत, जे एक सुविधाजनक, सिक्योर ऑथेंटिकेशन अनुभव प्रदान करेल व पासवर्डवरील निर्भरता कमी होईल. गुगलने आपल्या इनअॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजरची माहिती शेअर केली आहे. याचा उद्देश लोकांकडून वापर बंद झाल्यानंतर डिजिटल अकाउंट्स सुरक्षित राहील. माय अकाउंट सेटिंग्स अंतर्गत यूजर्स ठरवता येईल की, अकाउंट कधी इनअॅक्टिव्ह असेल, नॉटिफिकेशन कधी येईल व अकाउंट इनअॅक्टिव्ह असल्यास काय शेअर करायचे. दरम्यान, कंपनीने Google Play Store वरून १३६ बनावट अॅप्सला हटवले आहे. तुमच्या फोनमध्ये देखील असे अॅप्स हटवल्यास त्वरित डिलीट करा. Zimperium च्या रिपोर्टनुसार, हे अॅप्स यूजर्सच्या फोनमधून लाखो डॉलर्सची चोरी करत होते. यानंतर कंपनीने प्ले स्टोरवरून या बनावट अॅप्सला हटवले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3afoDTT