Full Width(True/False)

मनोज बाजपेयीला पितृशोक; आर. के. बायपेयी यांचं निधन

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याचे वडिल आर. के. बायपेयी यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८३ वर्षांचे होते. दिल्लीतील निगम बोध घाट इथं आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी वडिलांची तब्येत बिघडल्याचं समजताच मनोज बायपेयी केरळ इथं सुरू असलेलं शूटिंग रद्द करून दिल्लीला गेला होता. मनोजच्या वडिलांचं नाव राधाकांत बाजपेयी. ते शेतकरी होते. शेतकऱ्याच्या मुलानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याचं त्यांना कौतुक होतं. पण मुलगा मोठा सेलिब्रिटी असला तरी त्यांनी त्यांचा साधेपण जपला होता. बिहारमध्ये त्यांच्या जुन्या घरात ते वास्तव्यास होते. मनोज बाजपेयीनं साकारली वडिलांची भूमिका द फॅमिली मॅन आणि द फॅमिली मॅन २ या सीरिजमधील श्रीकांत तिवारी हे पात्र खूप भाव खाऊन गेलं. हे पात्र अभिनेता मनोज वाजपेयीने अतिशय उत्तमरित्या साकारलं आहे. एकीकडे देशाप्रती असलेली जबाबदारी निभावताना श्रीकांतचं कुटुंबावरही लक्ष असतं. या पात्राच्या अनेक कंगोऱ्यांपैकी वडिलाच्या बाजूने प्रेक्षकांना आपलंसं केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l2Sp4s