Full Width(True/False)

१ डिसेंबरपासून टीव्ही पाहणं महागणार, चॅनेल्स पाहण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' जास्त पैसे

नवी दिल्लीः पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे आधीच महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सोबत खाद्य तेल सुद्धा प्रचंड महाग झाले आहे. महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक झटका बसणार आहे. टीव्ही पाहण्यासाठी आता चॅनेल्ससाठी ५० टक्के जास्त खर्च करावा लागणार आहे. 'ट्राय'च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे किंमती वाढवण्यात येणार आहेत. ही दरवाढ येत्या १ डिसेंबर २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग चॅनेल स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, स्टार, सोनी आणि Viacom18 सह काही प्रादेशिक चॅनेल ने काही चॅनेल्स आपल्या बुकेतून बाहेर काढले आहेत. त्यामुळे टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढवण्यात येणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर जारी केल्या होत्या. त्यानंतर १ जानेवारी २०२० रोजी NTO 2.0 जारी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या चॅनेलच्या किंमती बदलत आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे (TRAI) म्हणणे होते की, NTO 2.0 ग्राहकांना फक्त तेच चॅनेल निवडण्याचा आणि पेमेंट करण्याचा पर्याय आणि स्वातंत्र्य देईल, जे त्यांना पाहायचे आहेत. एसपीएन चॅनेल पाहण्यासाठी आता मंथली ७१ रुपये मोजावे लागणार आहेत. आधी हे चॅनेल पाहण्यासाठी ३९ रुपये मोजावे लागत होते. झी साठी ४९ रुपये मोजावे लागू शकते. आता यासाठी फक्त ३९ रुपये मोजावे लागते. व्हायाकॉम १८ साठी मंथली ३९ रुपये मोजावे लागू शकते. आता यासाठी २५ रुपये मोजावे लागतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AVhh2N