Full Width(True/False)

कंगनाला योगी आदित्यनाथांकडून मिळाली राम मंदिराशी निगडीत भेट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सध्या आपल्या '' या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती इंडियन एअरफोर्स अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. कंगनाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिने मुरादाबाद येथील शुटींग पूर्ण केले आहे. त्यासोबतच हे देखील स्पष्ट केले की, लखनऊ येथे पोहोचल्यावर तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'आज सकाळी 'तेजस' सिनेमाचे मुरादाबाद येथील शेड्युल पूर्ण झाले. त्यानंतर लखनऊ येथे पोहोचले आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.' यासोबतच अभिनेत्रीने तिच्या टीमचेही आभार मानले. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अन्य दोन व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेली भेट खूपच छान होती. तिने मुख्यमंत्र्यांचं कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. कंगनाने तिच्या 'तेजस' चित्रपटाच्या शुटींगसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तिने म्हटले की, अगोदर आपल्याकडे उत्तर प्रदेशचे तपस्वी राजा श्रीरामचंद्र होते आणि आता आपल्याकडे योगी आदित्यनाथ आहेत. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी कंगना रणौतला एक नाणे दिले, ज्याचा वापर राम जन्मभूमी पूजनाच्यावेळी करण्यात आला होता. कंगनाचा आगामी चित्रपट 'तेजस' चे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करत आहे. या चित्रपटाची कथा वायुसेनेच्या एका महिला अधिकाऱ्यावर आधारित आहे, जी दहशतवाद्यांशी संघर्ष करते व त्यांना यमसदनी धाडते. कंगना या चित्रपटासोबतच 'धाकड', 'सीता' सिनेमांत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3B8c2h9