Full Width(True/False)

युट्यूबच्या माध्यमातून सीईओपेक्षा जास्त कमाई! २२व्या वर्षी कॅरी मिनाटीने कमावतोय इतका पैसा

मुंबई : नावाच्या मुलाने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी युट्यूबच्या जीवनात प्रवेश केला, आणि आज त्याचे तब्बल तीन कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. देशातील प्रसिद्ध आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या युट्यूबर्सपैकी एक असलेल्या कॅरी मिनाटी या तरुणाच्या वार्षिक उत्पन्नाबाबत नुकताच मोठा खुलासा झाला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे. युट्यूबर कॅरी मिनाटीचे खरे नाव असून तो त्याच्या कॉमिक अंदाजासह रोस्ट सेंट्रिक व्हिडिओकरिता ओळखला जातो. तुम्हाला हे ठावूकच असेल की, कॅरी मिनाटीने अवघ्या १० वर्षांचा असतानाच युट्यूबच्या जगात पाऊल ठेवले होते. आणि आज २२व्या वर्षी युट्यूबवर त्याचे तीन कोटी २४ लाख सबस्क्रायबर्स आहेत. कॅरी मिनाटीबाबत आणखी एक मजेदार सत्य हे आहे की, देशात जेव्हा टिकटॉकवरुन वाद सुरू होते, त्यावेळी त्याने बनवलेला 'युट्यूब विरुद्ध टिकटॉक - द एंड' हा व्हिडिओला तब्बल सात कोटी व्यूज मिळाले होते. मिनाटीचे वार्षिक उत्पन्न सीईओंपेक्षा अधिक! कॅरी मिनाटीच्या वार्षिक उत्पन्नाविषयी बोलायचे झाले तर ते अनेक कंपन्यांमध्ये असलेल्या सीईओपेक्षाही अधिक आहे. होय, माध्यमांतील वृत्तानुसार फरीदाबाद येथील रहिवासी असलेल्या अजय नागरचे एक वर्षाचे आर्थिक उत्पन्न साधारण तीन कोटी रुपये आहे. असे सांगितले जाते की कॅरी मिनाटी दर महिन्याला २५ लाख रुपयांची कमाई करतो. देशातील या सर्वोच्च स्थानी असलेल्या युट्यूबरची एकूण संपत्तीबाबत बोलायचे झाले तर कॅरी मिनाटीजवळ ३२ कोटींची संपत्ती आहे. कॅरी मिनाटी बॉलिवूड स्टार सनी देओल व ऋतिक रोषण यांची मिमिक्री देखील खूपच चांगल्या प्रकारे करतो. युट्यूबर भुवन बामकडे २२ कोटींची संपत्ती! कॅरी मिनाटीव्यतिरिक्त देशातील सर्वोच्च युट्यूबर्समध्ये भुवनबाम नावाच्या तरुणाचाही समावेश होतो. एका वृत्तानुसार भुवनबाम हा देशातील पहिला युट्यूबर आहे, ज्याने सर्वात अगोदर एक कोटी सबस्क्रायबर्स प्राप्त केले होते. मिळालेल्या माहितीनुसार भुवनबाम एकूण २२ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. भुवन हा मिंत्रा व मिवीसारख्या ब्रॅंड्सचा अॅम्बेसिडर देखील आहे. आणि या कंपन्यांकडून त्याला वर्षाला अनुक्रमे पाच कोटी व चार कोटींचे मानधन मिळते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3FQVVY0