मुंबई- मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर छापेमारी करत एनसीबीने आठ नामांकित व्यक्तिमत्त्वांना ताब्यात घेतलं आहे. क्रूजवर अंमली पदार्थ निरनिराळ्या ठिकाणी लपवून नेले जात होते. कुणी पॅन्टच्या शिलाईमध्ये तर कुणाच्या कॉलरमध्ये अंमली पदार्थ लपवण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये बॉलिवूड अभिनेता याचा मुलगा सह आणखी सात जण आहेत. त्यांची नावं खालीलप्रमाणे १. आर्यन खान २. अरबाज मर्चेंट ३. मुनमुन धमेचा ४. नूपुर सारिका ५. इसमीत सिंह ६. मोहक जसवाल ७. विक्रांत छोकर ८. गोमित चोप्रा कोण आहेत अटक करण्यात आलेले आठ जण क्रूजवर ताब्यात घेण्यात आलेले आठही जण नामांकित घरातील आहेत. आर्यन खान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आहे. परंतु, अटकेनंतर आपला या पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचं आर्यनने सांगितलं आहे. आपण वीआयपी पाहुणे म्हणून क्रूजवर गेल्याचं आर्यनने म्हटलं. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज मर्चंट आर्यनला पार्टीमध्ये घेऊन गेला होता. मोहक, नुपूर आणि गोमित दिल्लीचे राहणारे आहेत. मोहक फॅशन डिझायनर आहे आणि नुपूरही याच व्यवसायात आहे. नुपूर आणि गोमित एकत्र मुंबईत आले होते. गोमित एक हेअर स्टायलिस्ट आहे. एनसीबी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात करण्यात आलेल्या एका कारवाई दरम्यान पोलिसांना या क्रूजवरील पार्टीबद्दल माहिती मिळाली. गोव्यातील एका व्यक्तीने या क्रूजवर अंमली पदार्थ पोहोचवले होते. त्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3B9tPEA