Full Width(True/False)

फेसबुकवर नेते-सेलिब्रेटींची खिल्ली उडवणे पडणार महागात, होणार कठोर कारवाई

नवी दिल्ली : कोणत्याही घटनेनंतर सोशल मीडियावर त्याबाबत मीम्सची लाट आलेली असते. प्रामुख्याने सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. परंतु, आता नेते व अन्य सेलिब्रेटींची खिल्ली उडवणे महागात पडणार आहे. प्लॅटफॉर्म ने आपल्या पॉलिसीला अपडेट केले आहे. वाचाः कंपनीने माहिती दिली आहे की, सेलिब्रेटी, क्रिकेटर, राजकीय नेत्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींची खिल्ली उडवण्यासाठी तयार केलेल्या सेक्सच्यूअल कंटेंटला बॅन केले जाईल. तसेच, अशा लोकांवर कारवाई केली जाईल. Facebook चे ग्लोबल सेफ्ट हेड Antigone Davis यांनी ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली की, लोकांची प्रतिमा खराब करणे व ऑनलाइन त्रास देणाऱ्या यूजर्सवर कठोर कारवाई केली जाईल. फेसबुकने म्हटले आहे की, कंपनीने धोरणांमध्ये बदल करत महत्त्वाच्या व्यक्ती आणि खासगी व्यक्तींमध्ये अंतर हायलाइट केले आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य योग्यरित्या लागू केले जाईल व लोकांना टार्गेट करणाऱ्या पोस्ट हटवल्या जातील. आक्षेपार्ह कंटेंट देखील प्लॅटफॉर्मवरून हटवला जाईल. यासाठी कंपनी इनबॉक्समध्ये डायरेक्ट मेसेज पाठवण्याच्या नियमात बदल करेल. प्रोफाइल आणि पोस्टवरील कॉमेंटला सिक्योर करेल. तसेच, प्रसिद्ध लोकांची यादी तयार केली जाईल, जेणेकरुन ऑनलाइन होणाऱ्या छळपासून वाचवता येईल. दरम्यान, कंपनीने वर इंस्टाग्रामवर पब्लिक डिबेटसंदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,२५९ अकाउंट, पेज आणि ग्रुपला बॅन केले आहे. फेसबुकने ईराणमधील ९३ फेसबुक अकाउंट, १४ पेज, १५ ग्रुप आणि १९४ इंस्टाग्राम अकाउंटला हटवले आहे, याद्वारे इतर यूजर्सला टार्गेट केले जात होते. सुदानमध्ये देखील फेसबुकने ११६ पेज, ६६६ फेसबुक अकाउंट, ६९ ग्रुप आणि ९२ इंस्टाग्राम अकाउंटला हटवले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mUF9yu