Full Width(True/False)

BSNL 4G: बीएसएनएलकडून स्वदेशी 4G नेटवर्क, फ्रीमध्ये वाटले जाताहेत 4G सिम कार्ड, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनला आणखी पुढे नेण्यासाठी देशातील पहिले स्वदेशी ४जी नेटवर्कला आणले आहे. या मेड इन इंडिया नेटवर्कला भारतीय टेक्नोलॉजीच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या नेटवर्क संबंधी रविवारी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव आणि दूरसंचार सचिव यांच्यात चर्चा झाली आहे. फ्री मध्ये वाटले जात आहेत 4G सिम कार्ड बीएसएनएल ने स्वदेशी 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी देशातील अनेक राज्यात डिसेंबर पर्यंत फ्री मध्ये ४ जी सिम कार्ड वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, कंपनी भारतीय दूरसंचार उपकरण बनवण्यासाठी चंदीगड मध्ये टाटा कंसल्टेंसी सर्विसेज आणि राज्य द्वारा संचालित दूरसंचार अनुसंधान संगठन सी-डॉट सोबत प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट (पीओसी) तयार करणार आहे. पीओसीचा उद्देश बीएसएनएलच्या नेटवर्क मध्ये 4G उपकरण स्थापित करणे, चाचणी करणे आणि याची उपयुक्तात करणे हे होय. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दूरसंचार सचिव के राजारमन, बीएसएनल चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पी के पुरवार, सी-डॉट चे कार्यकारी निदेशक डॉ. राजकुमार उपाध्याय आणि टीसीएस चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून पीओसी प्रदर्शनची समीक्षा करण्यासाठी चंदीगडचा दौरा केला होता. टीसीएसने चंदीगड मध्ये ५ ठिकाणी ४जी रेडिओ उपकरण बसवले आहे. दूरसंचार मंत्री आणि दूरसंचार सचिव यांच्यात चर्चा बीएसएनएलचे पहिले 4G नेटवर्क अंतर्गत गेल्या रविवारी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव आणि दूरसंचार सचिव के. राजारमन यांच्यात चर्चा झाली. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, या नेटवर्कला भारतात डेव्हलेप करण्यात आले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनला आणखी गती मिळणार आहे. केंद्र सरकारने टेलिकॉम सेक्टरमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला म्हणजेच एफडीआयला मंजुरी दिली होती. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AvP8Pu