नवी दिल्ली: Amazon Great Indian Festival सेल सुरु असून या काळात अनेक स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. सेलमध्ये लेटेस्ट हा फो न २६,९९९ रुपयांऐवजी १८,५०० रुपयांमध्ये खरेदी केले करता येणार आहे. जाणून घेऊया Xiaomi 11 Lite NE 5G वर उपलब्ध ऑफर्सबद्दल. वाचा: Xiaomi 11 Lite NE 5G किंमत आणि ऑफर: Xiaomi 11 Lite NE 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची एमआरपी ३१,९९९ रुपये आहे.५,००० रुपयांच्या सूटसह २६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. सुरुवातीच्या १,२७१ रुपयांच्या ईएमआयवर देखील फोन खरेदी करता येईल . यावर १५,८५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची एमआरपी ३३,९९९ रुपये असून ५००० रुपयांच्या सूटसह २८,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तसेच, सुरुवातीच्या १,२७१ रुपयांच्या ईएमआयवर देखील स्मार्टफोन खरेदी करता येतो . यावर १,५५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे तर, एचडीएफसी बँकेच्या कार्डासह २,००० रुपयांची त्वरित सूट दिली जाईल. त्याचबरोबर प्रास्ताविक ऑफर अंतर्गत १,५०० रुपयांचे कूपन दिले जाईल. यासोबत ६ महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील दिला जाईल. अॅमेझॉनवर दिलेल्या ऑफरनुसार, त्याची MRP ३१,९९९ रुपये आहे. पण ते २६,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या प्रास्ताविक ऑफर अंतर्गत, १,५०० रुपयांची कूपन ऑफर, HDFC बँक कार्डवर २,००० रुपयांची तात्काळ सवलत आणि जुन्या स्मार्टफोनच्या देवाणघेवाणीवर अतिरिक्त ५,००० रुपयांची सूट दिली जाईल. म्हणजेच एकूण ८,५०० रुपयांची सूट. त्यानंतर फोन १८,५०० रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. प्राइम युजर्सना १२ महिने नो कॉस्ट ईएमआय आणि नॉन-प्राइम युजर्स ना ९ महिने नो कॉस्ट ईएमआय देण्यात येईल. Xiaomi 11 Lite NE 5G ची वैशिष्ट्ये: यात ६.५५ इंच FHD + OLED डॉट डिस्प्ले आहे. हा फोन ऑक्टा-कोर 5G आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे लिक्विड कूल तंत्रज्ञानासह येते. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्याचा, प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. दुसरा ५-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे आणि तिसरा ५-मेगापिक्सलचा सुपर मॅक्रो कॅमेरा आहे. २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा फोनमध्ये आहे. हे डिव्हाइस ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येते आणि MIUI 12.5 वर आधारित Android ११ वर काम करते. यात ४२५० एमएएचची बॅटरी आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mFKPfF