नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची टक्कर नेहमी खासगी टेलिकॉम कंपन्यांसोबत होते. खासगी कंपन्याच्या तुलनेत बीएसएनएल वेळोवेळी ग्राहकांसाठी नवीन नवीन ऑफर आणत असते. आता कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत बीएसएनएल ग्राहकांना चार महिन्यांपर्यंत फ्री मध्ये इंटरनेट मिळू शकणार आहे. कंपनीच्या या नवीन ऑफर अंतर्गत भारत फायबर आणि डिजिटल सब्सक्राइबर लाइन च्या ग्राहकांना चार महिन्यांपर्यंत फ्री मध्ये हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे. ही ऑफर बीएसएनएल लँडलाइन आणि बीएसएनएल ब्रॉडबँड ओव्हर वाय फाय वर सुद्धा लागू होणार आहे. परंतु, यासाठी एक अट आहे. ती म्हणजे, ग्राहकांना एकाचवेळी ३६ महिन्याचे बील पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर ४ महिने फ्री इंटरनेट मिळेल. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे ३६ महिन्याचे बील पेमेंट केल्यानंतर ४० महिन्यांपर्यंत इंटरनेट ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय, जर कोणी ग्राहक २४ महिन्यासाठी एकत्र पेमेंट करीत असेल तर त्याला तीन महिन्यांसाठी बीएसएनएल कडून फ्री इंटरनेट मिळेल. तर १२ महिन्याचे पेमेंट केल्यानंतर एक महिन्यासाठी फ्री इंटरनेट मिळेल. या ऑफरचा फायदा ग्राहकांना टोल फ्री नंबर १८००००३४५१५०० वर फोन करून किंवा जवळच्या स्टोरवर जावून घेवू शकता. बीएसएनएल ने नुकतीचे आपल्या ४जी सिम ऑफरची वैधता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. कंपनीने ही ऑफर काही वेळेआधी सुरू केली होती. आता हे त्या सर्व युजर्संसाठी आहे. जे १०० रुपयांचा पहिला रिचार्ज करतात. सध्या बीएसएनएल, फ्री सिम कार्ड केरळ सर्कल मध्ये देत आहे. परंतु, अपेक्षा आहे की, याला अन्य सर्कल मध्ये विस्तार केले जाईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FUUUhy