Full Width(True/False)

तुमच्या नकळत कोण पाहतंय तुमचे Facebook प्रोफाइल, माहित करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

नवी दिल्ली: आजच्या काळात, जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहे. साहजिकच, तुम्हीही वापरत असाल आणि कधीतरी तुमच्या देखील मनात हा प्रश्न येत असेल की तुमच्या नकळत तुमचे प्रोफाईल कोण पाहत असेल. हे जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट टिप्स सांगणार आहो. ज्यांच्या मदतीने तुम्ही हे सहज माहित करू शकाल. वाचा: फॉलो करा या स्टेप्स: Facebook वर तुमचे प्रोफाईल कोण पाहते हे जाणून घ्यायचे असल्यास, यासाठी तुम्हाला तुमच्या पीसी आणि लॅपटॉपवर फेसबुक अकाउंट उघडावे लागेल. फेसबुक पेज उघडल्यानंतर, माउसने राईट क्लिक करा तुम्हाला पेज स्रोत पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. नवीन पेज उघडल्यानंतर, CTRL+F वर क्लिक करा. कमांड दिल्यावर, राईडच्या बाजूला एक सर्च बॉक्स उघडेल, ज्यामध्ये तुम्ही BUDDY_ID प्रविष्ट करा. हे केल्यानंतर, तुम्हाला BUDDY_ID च्या बरोबरीने १५ अंकी आयडी दिसेल, तो कॉपी करा. त्यानंतर Facebook.com/15-digit ID टाका आणि एंटर करा. येथे ज्या यूजरने नुकतेच आपले फेसबुक प्रोफाईल पाहिले आहे त्याचा ID Open असेल. गेल्या वर्षी फेसबुकने अॅप लॉक फीचर लाँच केले होते. या वैशिष्ट्याच्या मदतीने, युजर्स त्यांच्या खाजगी गप्पा सुरक्षित ठेवू शकतात . युजर्सच्या खाजगी गप्पा कोणीही वाचू शकणार नाही. फेसबुकचे अॅप लॉक गोपनीयता सेटिंग्ज विभागात आहे, जे युजर्स सेटिंग बदलून वापरू शकतात. अॅपलॉकमध्ये फिंगरप्रिंट आणि फेस ऑथेंटिकेशन सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या फीचरमुळे युजर्सच्या चॅट आणि डेटा पूर्णपणे सुरक्षित राहत असल्याचे कंपनीचे मत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oU8CLE