Full Width(True/False)

सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी Facebook चे नाव बदलणार, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली : ची पॅरेंट कंपनी चे लवकरच री-ब्रँडिंग होणार आहे. फेसबुकला लवकरच नवीन ब्रँड नावाने ओळखले जाईल. याबाबतची घोषणा पुढील काही आठवड्यात होऊ शकते. फेसबुकचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कंपनी गुगलप्रमाणेच फेसबुकचे री-ब्रँडिंग करण्याची शक्यता आहे. फेसबुकच्या नवीन ब्रँडने मात्र Facebook, आणि WhatsApp च्या यूजर्सवर थेट कोणताही परिणाम होणार नाही. वाचा: Facebook ची सुरुवात एक सोशल मीडिया कंपनी म्हणून झाली होती. मात्र, सध्या अंतर्गत अनेक कंपन्या काम करत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना एकाच ब्रँड नेम अंतर्गत आणण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे फेसबुकला व्यवसाय योग्यरित्या पुढे नेण्यास मदत मिळेल. ब्रँडच्या नावात बदल करणारी फेसबुक ही पहिली कंपने नाहीये. याआधी २०१६ मध्ये Google ने री-ब्रँडिंग करत Alphabet केले होते. या अंतर्गतच सर्च इंजिन व इतर सहायक कंपन्या काम करत आहेत. २०१६ मध्ये Snapchat ने री-ब्रँडिंग कर Snap Inc नाव केले होते. याच प्रमाणे फेसबुक देखील री-ब्रँडिंग करणार आहे. यामुळे व व्हॉट्सअ‍ॅप सारख्या कंपन्या नवीन ब्रँड अंतर्गत काम करतील. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत संकेत दिले होते. दरम्यान, फेसबुकने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फेसबुकमध्ये सध्या १० हजारांपेक्षा अधिक काम करत आहेत. जे नवीन प्रोडक्ट जसे की, AR Glasses वर काम करत आहे. रिपोर्टनुसार, फेसबुक स्मार्टफोनवर देखील काम करत आहे. याशिवाय Metaverse वर देखील काम सुरू आहे. त्यामुळे कंपनीला सर्व व्यवसायांचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन करायचे आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pl7HEq