Full Width(True/False)

या महिन्यात इतके दिवस बँका बंद, 'असा' करा तुमचा व्यवहार, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: सणानिमित्त खरेदी करायची म्हणून जर तुम्ही बँकेत जायचे ठरवत असाल तर ते या महिन्यात थोडे कठीण आहे. कारण, सुट्ट्यांमुळे ३ दिवस या महिन्यात बँका बंद असतील. जे बँक खातेदार कोणत्याही व्यवसायात आहेत आणि बँकेत जाऊनच व्यवहार करातात. त्यांनी या दिवसांची नोंद करुन ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. अशा स्थितीत सर्व खातेधारकांनी Net Banking चा वापर करणे उत्तम. त्यात साधारणपणे आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. पाहा डिटेल्स. वाचा: जर तुम्ही Phone Banking किंवा Online Banking ची मदत घेतली तर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. जाणून घ्या बँकांच्या सुट्टीबद्दल ज्या अंतर्गत अनेक शाखा बंद असतील. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे काही वेळेस या सुट्ट्या संपूर्ण देशात नसून काही ठराविक राज्यातच असतात. उदाहरणार्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार , २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २ ऑक्टोबर गांधी जयंती यासारख्या राष्ट्रीय सुट्ट्यांच्या निमित्ताने देशभरातील सर्व बँका बंद राहतात. त्यानंतर दिवाळी, ख्रिसमस, ईद, गुरू नानक जयंती आणि गुड फ्रायडे सारख्या अनेक राष्ट्रीय सुट्ट्यांवरही बँका बंद असतात. दरम्यान, अनेक स्थानिक सण देखील आहेत, ज्याच्या निमित्ताने बँकेच्या शाखा बंद राहू शकतात. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सुट्ट्या व्यतिरिक्त, आरबीआयने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद ठेवणे बंधनकारक केले आहे. सर्व बँका रविवारी बंद असतात. बँकेच्या सुट्ट्या: २२ ऑक्टोबर २०२१: ईद-ए-मिलाद-उल-नबी, नंतर शुक्रवार, हॉलिडे : जम्मू, श्रीनगर. २३ ऑक्टोबर २०२१: चौथा शनिवार सुट्टी : संपूर्ण देश, २६ ऑक्टोबर २०२१: Accession day सुट्टी : जम्मू, श्रीनगर. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3plWUtw