Full Width(True/False)

Festive Sales Discounts: फेस्टिव्ह सेलमध्ये ग्राहकांना खरचं मिळतो डिस्काउंटचा फायदा? जाणून घ्या

नवी दिल्ली : दरवर्षी दिवाळीच्याआधी आणि फ्लिपकार्टसह अनेक ई-कॉमर्स वेबसाइट फेस्टिव्ह सेलचे आयोजन करतात. या सेलमध्ये प्रोडक्ट्सची सर्वात कमी किंमतीत विक्री केली जात असल्याचा दावा केला जातो. अनेकजण या सेलची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतेच अ‍ॅमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलचे आयोजन केले होते. यात आयफोनची आतापर्यंतची सर्वात कमी किंमतीत विक्री केली गेली. सेलमध्ये बहुतांश लोक प्रीमियम प्रोडक्ट्स खरेदीचा प्रयत्न करतात. मात्र, फेस्टिव्ह सेलमध्ये खरचं डिस्काउंटचा फायदा मिळतो का? याविषयी जाणून घेऊया. वाचा: फेस्टिव्ह सेलमध्ये अ‍ॅमेझॉनवर ची ३८,९९९ रुपये किंमतीत विक्री झाली. आता सेल समाप्त होत असताना फोनची किंमत ४१,९९९ रुपये आहे. म्हणजेच, सेलमध्ये फोनची ३ हजार रुपये कमी किंमतीत विक्री झाली. याच वर्षी होळीच्या वेळी आयफोन ११ ची ४१,९०० रुपये किंमतीत विक्री झाली. आयफोन १३ च्या लांचिंगनंतर अ‍ॅपलने सीरिजची किंमत देखील कमी केली आहे. अ‍ॅपलने किंमत कमी केल्यानंतर आयफोन १२ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ६५,९०० रुपये झाली होती. परंतु, फेस्टिव्ह सेलमध्ये आयफोन १२ च्या बेस व्हेरिएंटची ४८,९९ रुपयात विक्री झाली. तर प्लिपकार्ट सेलमध्ये ५२,९९९ रुपयात विक्री झाली. आता फोन ५३,९९९ रुपयात उपलब्ध आहे. म्हणजे, सेलमध्ये फोनवर १ हजार रुपये सूट मिळत होती. प्रत्येक सेलमध्ये मिळते सूट? एप्रिल महिन्यात फ्लिपकार्टवर Flagship Fest सेलचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात प्रीमियम स्मार्टफोनवर ४० हजार रुपयांची सूट दिली होती. या सेलमध्ये आयफोन ११ ची किंमत ४८,९९९ रुपये आणि आयफोन एक्सआर केवळ ३९,९९९ रुपयात उपलब्ध होता. मात्र, आता आयफोन ११ हा ४१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या एप्रिलमधील सेलमध्ये LG Wing वर ४० हजार रुपयांची सूट मिळत होती. सूटनंतर फोन २९,९९९ रुपयात उपलब्ध होता. आजही फ्लिपकार्टवर फोनची किंमत २९,९९९ रुपये आहे. या फोनला भारतात ६९,९९० रुपये किंमतीत लाँच केले होते. एकूणच, फेस्टिव्ह सेलमध्ये सर्व प्रोडक्ट्सवर थेट सूट मिळत नाही. प्रीमियम प्रोडक्ट्सवर थेट सूट मिळते, तर मिड रेंजच्या प्रोडक्ट्सवर बँक ऑफर्सचा लाभ मिळतो. फेस्टिव्ह सेलमध्ये फसवणुकीचा देखील धोका असतो. अनेकदा आयफोन आणि इयरबड्सच्या जागी इतर वस्तू आल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे खरेदीआधी अधिकृत वेबसाइटवर प्रोडक्ट्सची किंमत नक्की तपासावी. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XvX7yK