Full Width(True/False)

Flipkart Dussehra Specials सेलला सुरुवात, ‘या’ दमदार स्मार्टफोन्सवर मिळत आहे हजारो रुपयांची सूट

नवी दिल्ली : Big Billions Days समाप्त झाला असला तरी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सेल आयोजित केला आहे. हा सेल ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान चालेल. या दरम्यान, अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला नो-कॉस्ट ईएमआय आणि १२ हजार रुपयांपेक्षा अधिक एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येईल. याशिवाय ग्राहकांना बंपर डिस्काउंट आणि कॅशबॅक देखील मिळेल. वाचा: Flipkart Dussehra Specials सेलमध्ये ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. याशिवाय सर्व स्मार्टफोनवर कोटक बँकेकडन १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. तसेच, मोबाइल प्रोटेक्शन स्कीम देखील मिळेल. सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सवर ऑफर मिळत आहे, ते पाहुयात. Infinix Smart 5A स्मार्टफोन सेलमध्ये ६,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनवर कोटक बँकेकडून १० टक्के कॅशबॅक आणि डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय Axis बँकेकडून ५ टक्के कॅशबॅक मिळेल. फोनला २४३ रुपयांचे नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. तसेच, यावर ६,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. फोनमध्ये ६.५२ इंच डिस्प्ले दिला आहे. यात ५००० एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक हीलियो ए२० प्रोसेसर मिळतो. या फोनला तुम्ही १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ५ टक्के कॅशबॅक आणि १५ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय ३ हजार रुपये स्पेशल डिस्काउंट देखील मिळेल. एवढेच नाही तर फोनवर १५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या फोनला ३ हजार रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १९,९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनवर ३ हजार रुपये स्पेशल डिस्काउंट आणि कोटक बँकेकडून १० टक्के सूट दिली जात आहे. फोनला ३,३३२ रुपये नो-कॉस्ट ईएमआय आणि १७,६०० रुपये एक्सचेंज ऑफरवर खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६.४३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात स्नॅपड्रॅगन ६६३ प्रोसेसर दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oPfXMx