Full Width(True/False)

HP च्या ‘या’ शानदार लॅपटॉपवर मिळतेय तब्बल १० हजारांची सूट, बँक-एक्सचेंज ऑफर्सचाही मिळेल लाभ

नवी दिल्ली : ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या Amazon मध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आणि गॅजेट्सवर आकर्षक ऑफर्स मिळत आहे. याशिवाय नवीन लाँच झालेल्या प्रोडक्ट्सवर देखील आकर्षक डील्स देत आहे, यात काही डील्समध्ये ग्राहकांना जुने प्रोडक्ट्स एक्सचेंज करता येतील. तसेच, बँक ऑफर्सचा देखील लाभ घेता येईल. वाचा: Amazon प्राइस डिस्काउंटसह पेमेंट ऑप्शन्सवर देखील डिस्काउंट देत आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या लॅपटॉपवर देखील ग्राहकांना आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येईल. HP Pavilion Aero 13 Pavilion Aero 13 ऑगस्ट महिन्यात भारतात लाँच झाला आहे. या लॅपटॉपला एचपीचा आतापर्यंतचा सर्वात हलका AMD-बेस्ड कंझ्यूमर नोटबुक मानले जात आहे. भारतात या लॅपटॉपला ७९,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. मात्र, सेलमध्ये तब्बल १०,००९ रुपये डिस्काउंटनंतर ६९,९९० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय डीलमध्ये १७,९९० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येईल. तसेच, एचडीएफसी बँक क्रेडिट पेमेंट केल्यास १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. HP Pavilion Aero 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स HP Pavilion Aero 13 हलका लॅपटॉप असून, यात बिल्ट-इन अ‍ॅलेक्सा आणि फिंगरप्रिंट रीडर सारखे फीचर्स दिले आहे. ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियासह येणारा एचपीचा हा पहिला लॅपटॉप आहे. लॅपटॉपला रिसायकल्ड मटेरियलद्वारे तयार केले आहे. याचे डायमेंशन २९७x२०९x१६.९एमएम व वजन १ किलोपेक्षा कमी आहे. लॅपटॉपमध्ये १३.३ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २५६०x१६०० पिक्सल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो १६:१० आणि पीक ब्राइटनेस ४०० निट्स आहे. हा लॅपटॉप विंडोज १० वर काम करतो व विंडोज ११ मध्ये अपग्रेड करू शकता. Aero 13 लॅपटॉपमध्ये AMD Ryzen ५ ५६००U अथवा AMD Ryzen ७ ५८००U प्रोसेसरचा पर्याय मिळेल. यामध्ये १६ जीबी DDR४ रॅम आणि ५१२ जीबी PCIe NVMe M.२ SSD स्टोरेजचा पर्याय मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय ६, ब्लूटूथ वी५.२, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट, एक एचडीएमआय २.० पोर्ट दिले आहे. लॅपटॉपमध्ये हेडफोन आणि मायक्रोफोनसाठी एक कॉम्बो जॅक देखील आहे. यात ४५Whr ची बॅटरी दिली आहे, जी १०.५ तास टिकते. यामध्ये Bang & Olufsen च्या डबल स्पीकरसह ७२०पी एचडी वेब कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AqNbnx