नवी दिल्ली : Lenovo सध्या आपला नवीन टॅब लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचा हा टॅब गेल्या काही आठवड्यांपासून खूप चर्चेत आहे. कंपनी हळूहळू लॅपटॉपची वैशिष्ट्ये देखील समोर आणत असून आता कंपनीने आपल्या स्पीकर्स आणि वजनाची माहिती दिली आहे. असे सांगितले जात आहे की हा लेनोवो पॅड चार JBL स्पीकर्ससह येईल. एवढेच नाही तर कंपनी या पॅडमध्ये मजबूत आवाजासाठी डॉल्बी एटमॉस सपोर्ट देखील देणार आहे. वाचा: टॅब मध्ये Samsung E4 AMOLED डिस्प्ले : टॅब्लेटमध्ये १२.६ इंचाचा सॅमसंग E4 AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले २५६०x १६०० पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. एचडीआर १० + सपोर्टसह येणाऱ्या या टॅबमध्ये कंपनी १२० Hz रिफ्रेश रेट, ३६० हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन आणि डीसी डिमिंग फीचर देखील ऑफर करणार आहे. Lenoco च्या या आगामी टॅबला TUV Rheinland EyeSafe Display २.० प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. प्रीमियम लुक : मेटल बॉडी फिनिशसह लेनोवो टॅबचे वजन ५६८ ग्रॅम आहे. हे Apple आयपॅड आणि गॅलेक्सी टॅब मालिकेप्रमाणे प्रीमियम दिसते. सुरुवातीला आलेल्या काही टीझर आणि लीक्सनुसार, हा टॅब क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट, ZUI 13 OS आणि साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. ४५ W फास्ट चार्जिंग : कंपनी टॅबमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देणार आहे. यात ५ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचबरोबर, ८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह टॅबच्या पुढील बाजूस टाइम-ऑफ-फ्लाइट सेन्सर देण्यात आला आहे. टॅबमध्ये, कंपनी १०,२०० mAh ची बॅटरी प्रदान करेल, जी ४५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lphaIj