नवी दिल्ली : कंपनी ने जीटी न्यूओ २टी सह हँडसेटला देखील लाँच केले आहे. या फोनमध्ये शानदार चिपसेट, व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि ५००० एमएएचची बॅटरी असे फीचर्स मिळतात. या फोनची किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Realme Q3s स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: फोनमध्ये ६.६ इंच फुल-एचडी प्लस (१०८०x२४१२ पिक्सल) डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज, स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ९०.८ टक्के आणि बीक ब्राइटनेस ६०० निट्स आहे. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon ७७८G SoC सह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. सॉफ्टवेअर: फोन Android ११ वर आधारित Realme UI २.० वर काम करतो. कॅमेरा: फोनमध्ये बॅक पॅनेलवर तीन रियर कॅमेरे दिला असून, यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, एक मॅक्रो आणि एक पोर्ट्रेट कॅमेरा सेंसर आहे. बॅटरी: यात ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. Realme Q3s ची किंमत रियलमीचा हा फोन व्हाइट आणि ब्लू रंगात येतो. याच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,४९९ CNY (जवळपास १७,५०० रुपये) आहे. ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY १,५९९ (जवळपास १८,७०० रुपये) आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY १,९९९ (जवळपास २३,४०० रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lXdrCc