Full Width(True/False)

अॅपनंतर आता चीनी मोबाइल विरोधात मोदी सरकार घेऊ शकते 'हा' निर्णय, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने २०२० मध्ये पबजी आणि टिकटॉक सह जवळपास २५० हून जास्त चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. आता एका वर्षानंतर चायनीज स्मार्टफोन निशाण्यावर आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, लवकरच भारतात लाँच होणाऱ्या सर्व चायनीज स्मार्टफोनची तपासणी केली जावू शकते. या दरम्यान फोनमध्ये आधीच इंस्टॉल करण्यात आलेले अॅप्स युजर्संची हेरगिरी करीत तर नाही ना, हे पाहणार आहे. याशिवाय, फोनच्या पार्ट्सची तपासणी केली जावू शकते. इकोनॉमिक टाइम्स च्या रिपोर्टनुसार, या तपासणीसाठी केंद्र सरकार एक नवीन नियम बनवू शकते. संपूर्ण इंडस्ट्रीवर लागू होणार नियम रिपोर्टच्या माहितीनुसार, नवीन नियम आल्यानंतर तपासणीच्या आत पूर्ण भारतीय मोबाइल इंडस्ट्री येईल. परंतु, यात चायनीज कंपन्यांची तपासणी कडक केली जाईल. फोनमध्ये आधीच इंस्टॉल असलेल्या अॅप्ससाठी सरकार सोर्स कोडची मागणी करू शकते. नवीन नियम आल्यानंतर मोबाइल निर्माता कंपन्या त्या कंपन्यांची सुद्धा लिस्ट मागू शकते ज्यांच्या पार्ट्सचा वापर केला जात आहे. एकंदरीत सरकार भारतात लाँच होणाऱ्या सर्व स्मार्टफोन्सच्या हार्डवेयर आणि सॉफ्टवेयरची तपासणी करू शकते. विवो, शाओमी, ओप्पो लिस्टमध्ये टॉपवर भारतीय स्मार्टफोन बाजारात विवो, ओप्पो, शाओमी आणि वनप्लसची भागीदारी जवळपास ५० टक्के आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर या कंपन्यांची तपासणी कडक केली जावू शकते. भारतात विकले जाणारे स्मार्टफोन भारतीय युजर्संसाठी सुरक्षित आहेत की नाही, हे पाहिले जाणार आहे. या रिपोर्ट्सवर सरकार किंवा चायनीज मोबाइल कंपन्याकडून अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आधीच इंस्टॉल अॅपने हेरगिरीची भीती नुकतेच डबलिनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्च मध्ये म्हटले की, अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये आधीच इंस्टॉल्ड अॅप चोरून युजर्संचा डेटा आपल्या सर्वरवर स्टोर करीत आहे. हे अॅप्स स्क्रीन, वेब अॅक्टिविटी, फोन कॉल, डिव्हाइस, आयडेंटिफायर सारखी माहिती स्टोर करते. या रिपोर्टला तयार करण्यासाठी सॅमसंग, शाओमी, हुवावे आणि रियलमीचा पाठवण्यात आलेल्या डेटाचा वापर करण्यात आला होता. ज्या अॅप्सवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला होता त्यात गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट्स अॅप्सचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vusmHd