Full Width(True/False)

Instagram Reels डाउनलोड करण्याची सर्वात सोपी ट्रिक्स, थर्ड पार्टी अॅपची गरज नाही

नवी दिल्लीः भारतात टिकटॉकच्या बंदी नंतर खूपच पॉप्यूलर झाले आहे. भारतात केंद्रातील मोदी सरकारने शेकडो चायनीज अॅप वर बंदी घातली त्यात टिकटॉकचा समावेश होता. टिकटॉकच्या बंदीनंतर इंस्टाग्रामने रील्स सुरू केले. या ला युजर्संकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेक युजर्सं Instagram Reels ला डाउनलोड करायला पाहत असतात. परंतु, ते डाउनलोड होत नाहीत. यासाठी अनेक वेबसाइट्स आणि अॅप्स सुद्धा उपलब्ध आहेत. आज तुम्हाला या ठिकाणी Instagram Reels डाउनलोड करण्याची सोपी ट्रिक्स सांगणार आहोत. जाणून घ्या. Instagram Reels ला तुम्ही आपल्या डिव्हाइसवर सेव्ह करू शकता. याला तुम्ही ऑफलाइन पाहू शकता. तसेच हे Instagram Reels दुसऱ्यालाही सेंड करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची गरज पडणार नाही. आज या ठिकाणी Instagram Reels डाउनलोड करण्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहोत. Instagram Reels ला सेव्ह करण्यासाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. याच्या मदतीने तुम्ही Instagram Reels ला लॅपटॉप किंवा फोनमध्ये डाउनलोड करू शकता. INSTADP च्या मदतीने तुम्ही Instagram Reels ला ऑफलाइन पाहून सेव्ह करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला Instagram Reels वर जावे लागेल. या ठिकाणी व्हिडिओला सेव्ह करावे लागेल. त्यावर देण्यात आलेल्या तीन डॉट आयकॉन क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला कॉपी ऑप्शन मिळेल. रिल्सच्या लिंकला कॉपी करा. आता फोन किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरला ओपन करा. या ठिकाणी https://www.instadp.com वर जा. साइटवर इंस्टाग्राम रील्स डाउनलोड करण्याचा ऑप्शनवर जावे लागेल. यानंतर बॉक्स मध्ये Instagram Reels च्या लिंकला कॉपी केले होते त्याला पोस्ट करा. तुम्हाला Instagram Reels या ठिकाणी प्ले होईल. आपल्या रील्सच्या खालील आयकॉन वर क्लिक करून डाउनलोड करा. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y9c8q0