Full Width(True/False)

१५ हजारांच्या बजेटमध्ये भारतात लाँच झाला OPPO A55 स्मार्टफोन, पाहा फीचर्स

नवी दिल्ली : ने आपला नवीन OPPO A55 ला भारतात लाँच केले आहे. हा फोन OPPO A54 चे अपग्रेडेट व्हर्जन आहे. या डिव्हाइसमध्ये एचडी प्लस रिझॉल्यूशनसह येणारा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. यासोबतच, लेफ्ट कॉर्नरमध्ये पंच-होल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये हीलियो जी३५ प्रोसेसर, ५० मेगापिक्सल कॅमेरा, १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचा: OPPO A55 चे स्पेसिफिकेशन्स स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि ब्राइटनेस ५५० निट्स आहे. डिव्हाइसमध्ये हीलियो जी३५ प्रोसेसर दिला आहे. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने वाढवू शकता. OPPO A55 स्मार्टफोन अँड्राइड ११ आउट-ऑफ-द-बॉक्स बेस्ड ColorOS ११.१ वर का मकरतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि अन्य दोन २ मेगापिक्सल डेप्थ मॅक्रो लेंस आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी OPPO A55 स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. ही १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यामध्ये ड्यूल सिम, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ ५.०, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉकची सुविधा मिळेल. OPPO A55 ची किंमत OPPO A55 स्मार्टफोन स्टेरी ब्लॅक आणि रेनबो ब्लू रंगात येतो. फोनच्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,४९० रुपये आहे. तर ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,४९० रुपये आहे. फोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुक करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BbD8nq