नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच सीरिजला लाँच केले आहे. आता ची चर्चा सुरू झाली आहे. Apple iPhone SE 3 मध्ये ए१५ बायोनिक चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. या फोनला ऑरेंज ग्रीन आणि ब्लू या नवीन रंगात सादर केले जाऊ शकते. वाचा: टिपस्टर Macotakara नुसार, Apple ५जी कनेक्टिव्हिटी आणि पॉवरफुल इंटेरियर्ससह येणारे नवीन प्रोडक्ट लाँच करण्यावर काम करत आहे. याचे नाव iPhone SE 3 असेल. यात ए१५ बायोनिक चिपसेट दिला आहे. कंपनी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स६० ५जी मॉडेमचा देखील वापर करू शकते. तसेच, eSIM सपोर्ट मिळू शकतो. Apple iPhone SE 3 चे संभाव्य फीचर्स फोनच्या डिझाइनच्याबाबतीत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, यात ४.७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच, याचे बेझल्स जाड असतील. यात टच आयडी आणि होम बटन दिले जाईल. फोनला नवीन रंगात सादर केले जाईल. रिपोर्टनुसार, फोन रोज गोल्ड, सिल्वर आणि मेटेलिक रंगाऐवजी ऑरेंज, ग्रीन आणि ब्लू रंगात येईल. कंपनी iPhone SE 3 ला लवकरच लाँच करू शकते. मात्र, फोन नवीन लूकमध्ये येईल की नाही याची माहिती कंपनीने दिलेली नाही. iPhone SE च्या २०२० मॉडेलबद्दल सांगायचे तर, यात ए१३ बायोनिक चिपसेट मिळतो. सोबतच, ४.७ इंच रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. या फोनची किंमत २५,९९९ रुपये असून, डिव्हाइस रेड, व्हाइट आणि ब्लॅक रंगात येते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Apc5UE