Full Width(True/False)

Jio, Airtel, Vi च्या 'या' प्रीपेड प्लान्समध्ये स्वस्तात मिळताहेत OTT बेनिफिट्स आणि रोज 'इतके' GB डेटा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार मार्केटमध्ये , आणि Vi चे प्रीपेड प्लान्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि कदाचित म्हणूनच, युजर्स स्वत: साठी चांगले प्रीपेड निवडतांना गोंधळून जातात . म्हणून आज या बातमीमध्ये आम्ही तीनही दूरसंचार कंपन्यांचे काही निवडक डेटा प्लानबद्दल सविस्तर माहिती देत आहेत, ज्यात तुम्हाला दररोज ३ GB डेटा, मोफत कॉलिंग आणि OTT अॅप सबस्क्रिप्शन मिळेल. पाहा डिटेल्स. वाचा: Jio चा ३४९ रुपयांचा प्लान: Jio च्या या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या पॅकमध्ये दररोज ३ GB डेटा आणि १०० मेसेजेस दिले जातात. तसेच, युजर्स यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकतात. या व्यतिरिक्त, यात जिओ टीव्ही, चित्रपट, बातम्या, सुरक्षा आणि क्लाउडमध्ये मोफत प्रवेश मिळेल. Jio चा ४९९ रुपयांचा प्लान: Jio चा एक उत्तम प्रीपेड प्लान आहे. हा डेटा पॅक दररोज ३ GB डेटा आणि १०० मेसेजेस ऑफर करतो. या पॅकमध्ये ६ GB अतिरिक्त डेटा उपलब्ध असेल. तसेच, युजर्स कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करू शकतील. याशिवाय, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, जिओ टीव्ही, चित्रपट, बातम्या, सुरक्षा आणि क्लाउडचा प्लॅनमध्ये प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर या प्रीपेड पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. Airtel चा ३९८ रुपयांचा प्लान : Airtel च्या या प्रीपेड प्लानमध्ये दररोज ३ GB डेटा उपलब्ध आहे. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकतात. यासह, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि Wynk म्युझिकचे सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये १०० मेसेजेस मोफत दिले जात.असून या पॅकची वेळ मर्यादा २८ दिवसांची आहे. Airtel चा ४९९ रुपयांचा प्लान : Airtel च्या या प्रीपेड प्लानमध्ये दररोज ३ GB डेटा उपलब्ध आहे. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकतात. यासह, डिस्ने प्लस हॉटस्टार प्लस, Amazon प्राइम व्हिडिओ आणि विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शन, १०० मेसेजेस यासोबत मोफत दिले जात आहे .या पॅकची वेळ मर्यादा २८ दिवसांची आहे. Vi चा ५०१ रुपयांचा प्लान : व्होडाफोन-आयडियाचा हा प्रीपेड प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये दररोज ३ GB डेटा आणि १०० मेसेजेस उपलब्ध असून यासह, युजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, डेटा पॅकसह बिंगे ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर व्ही मूव्ही-टीव्ही आणि हॉटस्टारची सदस्यता देखील यात दिली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZRz7al