भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक दमदार रिचार्ज प्लॅन्स आणत आहेत. कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लॅन्स आणण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लासेस यामुळे डेटाचा वापर वाढला आहे. अशा स्थितीमध्ये डेली २ जीबीपासून ते ४ जीबीपर्यंत डेटा मिळेल, असे प्लॅन्स कंपन्या आणत आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे ६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे अनेक चांगले प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा, कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, दररोज ४ जीबी डेटासह येणाऱ्या या प्लॅन्सची वैधता १८ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंत आहेत. यात तुम्हाला केवळ डेटा-कॉलिंगच नाही तर ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. अशाच काही सर्वोत्तम प्लॅन्सविषयी जाणून घेऊया.

Vi चा २९९ रुपयांचा प्लॅन
२९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज ४ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा वापरता येईल. वीआय मूव्हीज आणि टीव्हीचा देखील मोफत अॅक्सेस मिळतो. प्लॅनमध्ये विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते.
Vi चा ४४९ रुपयांचा प्लॅन
५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज ४ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, बिंज ऑल नाइट, वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा मोफत अॅक्सेस आणि विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते.
Airtel चा ४४९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅनची वैधता २८ दिवस असून, यात दररोज ३ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय Disney+ Hotstar चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, Apollo २४/७ सर्कल, फ्री ऑनलाइन कोर्सेस, फ्री हॅलोट्यून्स, फ्री विंक म्यूझिक आणि FASTag वर १०० रुपये कॅशबॅक मिळेल.
एअरटेलचा ५५८ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लॅनची वैधता ५६ दिवस असून, यात Apollo २४/७ सर्कल आणि मोबाइल एडिशन फ्री ट्रायल मिळेल.
जिओचा २४७ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या २४७ रुपयांच्या प्रीपेड फ्रीडम प्लॅनची वैधता ३० दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २५ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा वापरण्यासाठी कोणतीही मर्यादा नसून, तुम्ही एका दिवसात देखील सर्व डेटा वापरू शकता. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps स्पीडने डेटा मिळेल. याशिवाय रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० एसएमएसचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.
जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा यानुसार एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.
जिओचा ४९९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता २८ दिवस असून, यात ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ६ जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळेल.
जिओचा ५९७ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता ९० दिवस असून, यात एकूण ७५ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. हा डेटा तुम्ही कोणत्याही लिमिटशिवाय वापरू शकता. डेटा समाप्त झाल्यानंतर स्पीड ६४ Kbps राहील. प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.
Jio चा ५९९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनची वैधता ८४ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n6gVkT