नवी दिल्लीः Reliance च्या फोनची फार उत्सूकता आहे. नुकतेच या फोनला गुगल प्ले कन्सोलवर पाहिले गेले आहे. या लिस्टिंगवरून अनेक खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती उघड झाली आहे. कंपनीने यावर्षी जून मध्ये आपल्या वार्षिक जनरल मीटिंग मध्ये जिओ फोन नेक्स्टची घोषणा केली होती. सुरुवातीला कंपनीने घोषणा केली होती की, हा फोन १० सप्टेंबर रोजी बाजारात उपलब्ध करण्यात येईल परंतु, असे झाले नाही. गेल्या महिन्यात कंपनीने एक वक्तव्य जारी करून सांगितले होते की, हा फोन दिवाळीच्या जवळपास मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. त्यामुळे असे मानले जाते की, हा फोन या महिन्यातील अखेर पर्यंत किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. जिओ फोन नेक्स्ट मध्ये कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले जाणार आहेत, जाणून घ्या. जिओ फोन नेक्स्टचे फीचर आणि स्पेसिफिकेशन गुगल प्ले लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनमध्ये कंपनी 720x1440 पिक्सल रेजॉलूशन सोबत एचडी डिस्प्ले ऑफर करणार आहे. फोन २ जीबी रॅम सोबत येईल. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन २१५ चिपसेट देणार आहे. हा फोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. असे मानले जात आहे की, ओएस अँड्रॉयड ११ चे गो एडिशन मिळू शकते. फोनसंबंधी आधीच अनेक लीक्स समोर आली आहेत. यासोबत जिओचा हा फोन ५.५ इंचाचा डिस्प्ले सोबत येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी १३ मेगापिक्सलचा रियर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करू शकते. फोनचे २ जीबी रॅम व्हेरियंट १६ जीबीचे इंटरनल स्टोरेज आमि ३ जीबी रॅमचे मॉडल ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज सोबत येवू शकतो. या फोनमध्ये 2500mAh ची बॅटरी ऑफर करू शकते. जिओ आणि गुगल मिळून जिओ फोन नेक्स्ट मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स ऑफर करीत आहे. या अपकमिंग फोनमध्ये ऑन स्क्रीन ट्रान्सलेशन, ऑटोमॅटिक रीड अलाउड, इंडिया सेंट्रिक कॅमेरा फिल्टर आणि गुगल असिस्टेंट सारखे फीचर मिळणार आहे. या फोनची किंमत ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. वाचा: १ वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C2L3nF