नवी दिल्ली : XR20 भारतात लाँच झाला असून, हा मिलिट्री-ग्रेड डिझाइनसह येतो. १.८ मीटर खोल पाण्यात देखील फोन सुरक्षित राहतो. फोनला ४ वर्ष मंथली सिक्योरिटी अपडेट आणि ३ वर्ष ओएस अपग्रेड मिळणार आहे. या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: १ किंमत आणि ऑफर्स Nokia XR20 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४६,९९९ रुपये आहे. Granite आणि Ultra Blue रंगात येणाऱ्या या फोनला आजपासून प्री-बुक करू शकता. फोनची विक्री ३० ऑक्टोबरपासून सुरू होईल. स्मार्टफोनला नोकियाची अधिकृत वेबसाइट, प्रमुख ई-कॉमर्स साइट आणि रिटेल स्टोरवरून खरेदी करू शकता. फोनचे प्री-बुकिंग कऱणाऱ्या ग्राहकांना ३,५९९ रुपये किंमतीचे Nokia Power Earbuds Lite मोफत मिळेल. कंपनीने घोषणा केली आहे की, प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना १ वर्षासाठी मोफत स्क्रीन प्रोटेक्शन प्लान देखील मिळेल. जुलै महिन्यात हा फोन यूरोपमध्ये लाँच झाला होता. या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९९ EUR (जवळपास ४३,५०० रुपये) होती. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स: Nokia XR20 मध्ये ६.६७ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ असून, डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन दिले आहे. फोन अँड्राइड ११ वर काम करतो. यात ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ४८० प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि १३ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर दिला आहे. हा कॅमेरा सेटअप Zeiss ऑप्टिक्ससह येतो. फोन स्पीड शार्प मोडसह प्रीलोडेड आहे. यात एक अॅक्शन कॅम मोड देखील आहे. यामध्ये विंड-नॉइस कॅन्सिलेशनसह OZO स्पॅटियल ऑडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट दिले आहे. हे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये मदत करते. तसेच, यात स्टीरियो स्पीकर दिला असून, जो QZO प्लेबॅक सपोर्टसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ४जी LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ वी५.१, जीपीएस, NavIC, एनएफसी, यूएसबी टाइप-सी, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि ड्यूल सिम सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. Nokia XR20 स्मार्टफोन MIL-STD८१०H-सर्टिफाइड बिल्डसह येतो. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी याला आयपी६८ रेटिंग दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये ४६३० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी १८ वॉट वायर्ड आणि १५ वॉट वायरलेस क्विक चार्जिंग सपोर्टसह येतो. फोनचे डायमेंशन सांगायचे तर याची लांबी १७१.६४ एमएम, रुंदी ८१.५ एमएम, जाडी १०.६४ एमएम आणि वजन २४८ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nahhHl