नवी दिल्ली : MSI ने एक नवीन नोटबुक लाँच केले असून हे डिव्हाइस गेमिंगचा अनुभव सुधारतो. या लॅपटॉपची स्क्रीन १५.६ इंच आहे. यात अनेक चांगली वैशिष्ट्ये आहेत, जी युजर्सचा गेमिंग अनुभव सुधारते. यात Ryzen 9 5900HX CPU आणि Radeon RX 6700M GPU आहे. च्या तपशील आणि किंमतीबद्दल जाणून घ्या सविस्तर. वाचा: या MSI लॅपटॉपमध्ये फुलएचडी (१९२० × १०८० पिक्सेल) पॅनल आहे, ज्याला १६ GB DDR4 रॅम देण्यात आली आहे. तसेच या लॅपटॉपमध्ये युजर्सना ५१२ GB M.2 NVMe SSD स्टोरेज देण्यात आले आहे. हा लॅपटॉप Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) वर काम करेल आणि Windows 11 उपलब्ध झाल्यानंतर युजर्स ते त्यांच्या लॅपटॉपवर स्थापित करू शकतील. युजर्सची ची गरज लक्षात घेता , MSI ने उत्कृष्ट बॅटरी लाईफ प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा वापर एकाच चार्जवर १२ तासांपर्यंत केला जाऊ शकतो. ब्लूटूथ ५.२ आणि वायरलेस लॅनला वायरलेस कम्युनिकेशनसाठी सपोर्ट करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पोर्ट्सबद्दल बोलायचे तर, यात १ USB 3.2 Gen 2 Type C पोर्ट, 1 USB 3.2 Gen 2 Type C पोर्ट असून MSI Laptop कार्बन ग्रेमध्ये असेल. या MSI लॅपटॉपची किंमत कदाचित २,१८,००० येन (अंदाजे १,४६,२४४ रुपये) असेल. त्याची पूर्व नोंदणी ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून लॅपटॉप १४ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. MSI गेमिंग लॅपटॉपसाठी एक लोकप्रिय ब्रँड आहे. MSI कडे भारतात बरेच चांगले लॅपटॉप आहेत, जे विविध वैशिष्ट्यांसह येतात. यापैकी बरेच लॅपटॉप ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विक्रीदरम्यान खरेदी केले जाऊ शकतात. दोन्ही प्लॅटफॉर्मवर MSI लॅपटॉप उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: ' वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aC1ifz