नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित आज चीनमध्ये लाँच करण्यात येणार असून 9Rt लाँच इव्हेंट स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता (IST संध्याकाळी ५.३० वाजता) होईल. स्मार्टफोनच्या चायना वेबसाइट आणि वीबो अकाउंट द्वारे हा इव्हेन्ट लाईव्ह स्ट्रीम केला जाणार असून हे डिव्हाइस काही आठवड्यांत भारतातही लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबद्दल काहीही सांगितले नसले तरी ब्रँडने OnePlus 9RT ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये मात्र नक्कीच उघड केली आहेत. पाहा डिटेल्स. वाचा: OnePlus तर्फे खुलासा करण्यात आला आहे की कंपनीचा नवीन फोन क्वालकॉमच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरसह सुसज्ज असेल. हाच चिपसेट सध्या OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro ला पॉवर देत आहे. कंपनीने एक टीझरद्वारे आधीच पुष्टी केली आहे की हे उपकरण ५-आयामी उष्णता विघटन डिझाइनसह येईल. तसेच, 7७ GB व्हर्च्युअल रॅमसाठी देखील समर्थन देईल. OnePlus चे म्हणणे आहे की प्रीमियम फोन सॅमसंगचा E4 AMOLED डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्टसह वापरेल. हे एलपीडीडीआर ५ रॅम आणि यूएफएस ३.१ स्टोरेजसह येईल. हा स्मार्टफोन ६५ W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह येईल. कंपनी हे चार्जर बॉक्सच्या आत पाठवेल. टीझरने हे देखील कन्फर्म केले आहे की, OnePlus 9RT मध्ये मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये ५० एमपी कॅमेरा सेन्सर असेल. OnePlus ने अद्याप सेटअपमधील इतर लेन्स उघड केले नाहीत. पण, डिव्हाइस ४,५०० mAh ची बॅटरी ऑफर करणार असल्याचे ब्रँडने कन्फर्म केले आहे. एक टीझर असेही सुचवितो की, OnePlus 9RT दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध केले जाईल, ज्यात ब्लॅक आणि ग्रे समाविष्ट आहेत. उर्वरित तपशील अद्याप उघड करणे बाकी आहे. हे डिव्हाइस चीनमध्ये १९ ऑक्टोबर रोजी विक्रीसाठी जाईल आणि १३ ऑक्टोबर रोजी प्री-ऑर्डर विंडो उघडेल. वनप्लसच्या या उपकरणाबद्दल भारतीय ग्राहकही खूप उत्सुक आहेत. पण आता त्यांना वाट पाहावी लागेल. कारण चीनमध्ये लाँचिंग नंतरच OnePlus 9RT भारतात येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YSPPFT