Full Width(True/False)

समीर वानखेडेंच्या करिअरमागे कोण आहे, क्रांती रेडकरने सांगितलं

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीचे संचालक यांचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रूझ शिपमधील रेव्ह पार्टीवर केलेली छापेमारी आणि त्यातून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेल्या अटकेवरुन ही चर्चा सुरू झाली. क्रूझवरून अटक करण्यात आलेल्यांसोबतच सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यनच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. या धडक कारवाईमुळे आज समीर वानखेडे यांना बहुसंख्य लोक हिरो मानत आहेत. समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीरच्या डॅशिंग करिअरच्या मागे कोणती व्यक्ती आहे, जी प्रत्येकवेळी त्यांना मार्गदर्शन करत असते ते सांगितले. यापूर्वीही समीर यांची शिस्तप्रिय कामगिरी समीर वानखेडे यांनी छापेमारी करुन केलेली कारवाई वा बॉलिवूडमधील कलाकरांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्ष २००७ मध्ये जेव्हा ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कस्टम ऑफिसर (सीमा शुल्क अधिकारी) म्हणून कार्यरत होते, तेव्हा विमानतळातून एकाही सेलिब्रिटीचे सामान विनातपासणीचे जाऊ न देण्याबाबत ते खूपच कडक होते. समीर वानखेडे हेच आजचे सिंघम! सध्या लोक समीर वानखेडे यांना खरा सिंघम बोलत आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या पतीविषयी बोलताना सांगितले की, समीर हे कोणत्याही दबावात काम करण्यात तरबेज आहे. तिने हे देखील सांगितले की, 'ते आपल्या ऐतिहासिक नेत्यांच्या विचारांशी जोडले गेले आहेत, ते जगभरातील खूपसाऱ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या कथा वाचून मोठे झाले आहेत.' वडील हेच समीर यांचे मार्गदर्शक समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे देखील एक पोलीस अधिकारी होते, जे सध्या निवृत्त झाले आहेत. क्रांतीने सांगितले की, 'जेव्हाही समीर कोणत्या समस्येत अडकतात किंवा त्यांना कोणता निर्णय घेताना त्रास होतो, तेव्हा ते त्यांच्या वडिलांशी संपर्क साधतात. ते समीर यांच्या जीवनात मार्ग दाखवऱ्या प्रकाशासमान आहेत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YL27zW