Full Width(True/False)

कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्र कोठे सेव्ह केले विसरलात? आता थेट PayTM वरुन करता येईल अ‍ॅक्सेस; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली : केवळ ऑनलाइन शॉपिंगसाठी सुरू झालेले अ‍ॅप आज ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन बॅकिंगसह अनेक सुविधा देत आहे. सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट कंपनी असलेली यूजर्ससाठी सातत्याने नवनवीन सुविधा उपलब्ध करत आहे. वाचाः आता पेटीएमने एक नवीन फीचर आणले असून, कंपनीने अ‍ॅपमध्ये फीचर इंटिग्रेट केले आहे. आता सेक्शनमध्ये यूजर्स स्वतःचे सर्व सरकारी रेकॉर्ड्स पाहू शकतात. याद्वारे विमा, वाहन आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कोविड-१९ वॅक्सिन प्रमाणपत्रासह महत्त्वपूर्ण कागदपत्रं अ‍ॅपमध्ये उपलब्ध होतील. Digilocker डॉक्यूमेंट्सचा टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी सेल्फ-केवायसी म्हणून वापर करता येतो. हा एक क्लाउड आधारित प्लॅटफॉर्म आहे. यात सर्व सरकारी कागदपत्रं डिजिटल कॉपी स्वरुपात स्टोर असतात. DigiLocker मधील कागदपत्रं ही IT (Information Technology) Act २००० द्वारे अप्रूव्हड आहेत. पेटीएममध्ये डिजीलॉकरच्या फीचरमुळे यूजरचा डेटा डिव्हाइस स्टोरेजमध्ये सेव्ह होईल. ऑफलाइन असतानाही पेटीएमद्वारे सहज ही कागदपत्रं पाहता येतील. पेटीएम अ‍ॅपवरून कोविड-१० वॅक्सिन स्लॉट बुक करणाऱ्यांसाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. यात यूजर्स आपल्या लसीकरण प्रमाणपत्राला देखील पेटीएमद्वारे डिजीलॉकरमध्ये सेव्ह करू शकतात व कधीही एका क्लिकवर पाहता येईल. इतर महत्त्वाची सरकारी कागदपत्रं देखील यात स्टोर करता येईल. पेटीएममध्ये लसीकरण सर्टिफिकेट असे करा अ‍ॅक्सेस
  • यूजर्स पेटीएम अ‍ॅपमध्ये सेक्शमध्ये जाऊन डिजिटल स्वरुपात सेव्ह केलेले सर्व कागदपत्रं पाहू शकतात.
  • यासाठी सर्वात प्रथम पेटीएम अ‍ॅक्सेसप डाउनलोड करा व डाव्या बाजूला वरती असलेल्या प्रोफाइलवर टॅप करा.
  • आता डिजीलॉकर सेक्शनमध्ये जा.
  • डिजीलॉकर सेक्शनवर क्लिक केल्यानंतर डिजीलॉकर मिनी अ‍ॅपवर रीडायरेक्ट व्हाल, येथे तुम्हाला वेगवेगळी कॅटेगरी दिसेल.
  • तुम्ही Your Documents मध्ये जाऊन तुमची कागदपत्रं पाहू शकता.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p84k3n