नवी दिल्ली : भारतीय बाजारात आज GT Neo 2 लाँच होणार आहे. या फोनच्या लाँचबाबत कंपनीने माहिती दिली असून, यासाठी अधिकृत वेबसाइटवर एक मायक्रोसाइट बनवली आहे. आज दुपारी १२:३० वाजता व्हर्च्यूल इव्हेंटमध्ये फोन लाँच होईल. इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रीमिंग रियलमीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, युट्यूब आणि फेसबुकवरुन केला जाईल. या फोनची वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊया. वाचा: Realme GT Neo 2 चे संभाव्य फीचर्स हा फोन Qualcomm Snapdragon ८७० प्रोसेसर आणि Adreno ६५० GPU सह येईल. यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला असून, याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल आहे. दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, तिसरा २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ४जी LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.१, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहे. फोनमध्ये ६.६२ इंच FHD+ E4 AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ दिला आहे. पॉवरसाठी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे. याशिवाय इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. Realme GT Neo 2 ची संभाव्य कीमत भारतात जवळपास २८,५०० रुपयात लाँच होण्याची शक्यता आहे. ही याच्या बेस मॉडेलची किंमत असेल. तर हाय-एंड व्हेरिएंटची किंमत जवळपास ३० हजार रुपये असू शकते. हा फोन OnePlus 9R आणि Mi 11X ला टक्कर देईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AGqTy9