नवी दिल्ली: स्मार्टफोन भारतात आज, म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार असून Vivo V21 5G स्मार्टफोनचा हा निऑन स्पार्क कलर व्हेरिएंट असेल. फोन आधीच डस्क ब्लू, सनसेट डिझेल आणि आर्टिक व्हाईट कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस ६४ MP चा मजबूत कॅमेरा आणि ४४ MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल . ३ GB विस्तारित रॅम सपोर्ट फोन मध्ये उपलब्ध असेल.तसेच, हा अल्ट्रा स्लिम स्मार्टफोन असेल, ज्याची जाडी ७.३९ मिमी आणि डिझाईन मॅट ग्लासचे असेल. वाचा: Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच FHD + AMOLED AMOLED डिस्प्ले असेल. याचे रिझोल्यूशन १०८० x२४०४ पिक्सेल असेल. तर,त्याचा रिफ्रेश रेट ९० Hz असू शकतो. फोनला ५०० निट्सची चमक मिळेल. Vivo V21 5G स्मार्टफोन MediaTek Helio Dimensity 800U प्रोसेसर सपोर्टसह येईल. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित फनटच ओएस ११. १ वर काम करेल. Vivo V21 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्याचा मुख्य कॅमेरा ६४ MP चा असेल. याशिवाय ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ एमपी मॅक्रो लेन्स दिले जातील. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ४४ MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. Vivo V21 5G कॅमेरा Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी, Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये ४,००० mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. Vivo V21 5G संभाव्य किंमत Vivo V21 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येईल. त्याचा ८ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज पर्याय २९,९९० रुपयांना येईल. तर, ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३२,९९० रुपये असेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BQQyG9