नवी दिल्लीः Redmi Note 11 सीरीज़ २८ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. लाइनअप मध्ये अनेक व्हेरियंटचा समावेश आहे. Redmi Note 11, Note 11 Pro आणि Note 11 Pro + 5G सोबत कंपनी Redmi Watch चे पुढचे जनरेशन ला सुद्धा लाँच करण्याची शक्यता आहे. टीझर इमेज स्मार्टवॉचच्या डिझाइनला दिसत आहे. यात थोडे वेगळ्या टाइपने किनाऱ्यासोबत एक चौकोनी डायल आणि उजव्या बाजुला एक बटन असणार आहे. Redmi Watch 2 गोल्ड, ब्लॅक, आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल. पोस्टर इमेज हेच दाखवते की, वॉच २ मध्ये अनेक वॉच फेस असतील. Redmi Watch 2 मध्ये SpO2 मॉनिटर, हार्ट रेट सेंसर, स्लीप आणि स्पोर्ट्स मोड ट्रॅकिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. ज्यात सायकलिंग, स्वीमिंग, रनिंग आदीचा समावेश आहे. परंतु, रेडमी वॉच २ संबंधी अधिकची माहिती समोर आली नाही. परंतु, आम्हाला अपेक्षा आहे की, याच महिन्याच्या अखेरपर्यंत याच्या लाँचिंग आधी टीझर समोर येतील. Redmi Note 11 सीरीजमध्ये हे असेल खास याशिवाय, Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ कलर आणि रॅम स्टोरेज ऑप्शन समोर आले आहे. Redmi Note 11 Pro तीन कॉन्फ़िगरेशन मध्ये येईल. 6GB+128GB, 8GB+128GB, आणि 8GB+256GB मिस्टिरियस ब्लॅक, मिस्टी फॉरेस्ट, क्विट पर्पल आणि अन्य एका रंगात उपलब्ध होणार आहे. तर Redmi Note 11 Pro + मध्ये समान स्टोरेज मॉडल मध्ये मिळेल. परंतु, फक्त तीन रंगात उपलब्ध होईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3niiext