नवी दिल्ली : महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक असलेल्या कार्डला द्वारे जारी केले जाते. यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, आधार नंबर, फोटो आणि बायोमेट्रिक डेटाचा समावेश असतो. बँकिंगपासून ते गॅस सिलेंडर बुकिंगपर्यंत आधार कार्डचा वापर केला जातो. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे अनिवार्य आहे. अनेकदा आधार कार्डवरील फोटोमधील व्यक्ती ओळखणे कठीण जाते. वाचा: जर तुम्हाला देखील आधार कार्डवरील फोटो बदलायचा असेल तर ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. UIDAI आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्याची परवानगी देते. यासाठी तुम्हाला ऑनलाइन विनंती करावी लागेल, त्यानंतर जवळील आधार सेंटमध्ये जाऊन फोटो अपडेट करता येईल. आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्यासाठी वापर या स्टेप्स
- सर्वात प्रथम आधार वेबसाइटवर लॉग इन करा.
- आता आधार कार्ड अपडेटसाठी फॉर्म भरा. आधार नंबर व इतर महत्त्वाची माहिती द्या.
- आता आपल्या जवळील आधार केंद्रावर जा.
- तुमचा फॉर्म सबमिट करा.
- तुमच्याकडे मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशी महत्त्वाची कागदपत्रं असणं गरजेचे आहे.
- केंद्रावर तुमचे आधार कार्ड देखील घेऊन जा.
- त्यानंत केंद्रावरील कर्मचारी एक फोटो आणि आधार कार्डची बायोमेट्रिक माहिती घेईल.
- त्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल, ज्यावर URN असेल.
- URN चा उपयोग आधार स्टेट्स चेक करण्यासाठी करू शकता.
- त्यानंतर दोन आठवड्यात तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर आधार कार्ड येईल.
- फोटो बदलण्यासाठी २५ रुपये व जीएसटी असे शुल्क द्यावे लागेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3G5m1GR