नवी दिल्ली : टेक कंपनी ने Unpacked event 2 ची घोषणा केली आहे. हा इव्हेंट २० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये लाँच होणाऱ्या प्रोडक्ट्सची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. याआधीच्या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, Galaxy Buds 2, Galaxy Watch 4 आणि Watch 4 Classic ला लाँच करण्यात आले होते. वाचाः या इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रीमिंग सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता) सुरू होईल. या इव्हेंटला कंपनीचे अधिकृत युट्यूब चॅनेल आणि फेसबुक अकाउंटवर पाहू शकता. हे डिव्हाइस होऊ शकतात लाँच लीक रिपोर्टनुसार, अनपॅक्ड इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप फोनचे स्वस्त व्हेरिएंट लाँच होऊ शकते. यासोबतच, गॅलेक्सी टॅब एस८ ला सादर केले जाईल. यूजर्सचा अनुभव अधिक शानदार बनविण्यासाठी नवीन अॅप्ससह इंटरफेसमध्ये बदल केला जाईल. Samsung Galaxy S21 सॅमसंगने यावर्षीच्या सुरुवातीला Samsung Galaxy S21 स्मार्टफोनला लाँच केले होते. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ५९,९९९ रुपये आहे. यामध्ये ६.२ इंच फुल एचडी+ डायनॅमिक एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. या डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, १२ मेगापिक्सल लेंस आणि ६४ मेगापिक्सल टेलिफोटो लेंस मिळते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला १० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Samsung Galaxy S21 स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी दिली आहे. यात ५जी, ४जी LTE, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iZETND