नवी दिल्ली: आजकाल युजर्स वार्षिक प्लान्सकडे आकर्षित होतांना दिसत आहे. अशात, प्रत्येक दूरसंचार कंपनी वार्षिक प्लान्स प्रदान करत असून जर तुम्ही युजर असाल, तर आम्ही तुमच्यासाठी Jio कंपनीच्या Annual Plans ची माहिती घेऊन आलो आहोत. या प्लान्सची वैधता ३३६ दिवसांपासून ३६५ दिवसांपर्यंत आहे. जर तुम्ही दररोजच्या किमतीचा हिशोब केला तर ते ७ रुपयांपेक्षाही कमी आहे. याचा अर्थ असा की तुम्ही या Jio Plans चा लाभ दररोज ७ रुपये खर्चाने घेऊ शकाल. वाचा: Jio चा २,१२१ रुपयांचा प्लान: यामध्ये यूजर्सना दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. तसेच, त्याची वैधता ३३६ दिवसांची आहे. अशा परिस्थितीत, संपूर्ण वैधता कालावधी दरम्यान युजर्सना ५०४ जीबी डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाईल. याशिवाय दररोज १०० SMS देखील दिले जातील. युजर्सना जिओ अॅप्सची सदस्यता देखील यात दिली जात आहे. Jio चा ३,४९९ रुपयांचा प्लान: हा कंपनीचा वार्षिक प्लान देखील आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा उपलब्ध केला जात आहे. त्याच्या प्लान ची वैधता ३६५ दिवसांची आहे. संपूर्ण वैधता कालावधी दरम्यान १०९५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय, दररोज १०० मेसेजेस देखील दिले जातील. युजर्सना जिओ अॅप्सची सदस्यता देखील दिली जात आहे. Jio चा २,५९९ रुपयांचा प्लान: यामध्ये यूजर्सना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय अतिरिक्त १० जीबी डेटा देखील दिला जात आहे. तसेच, त्याची वैधता ३६५ आहे. अशा परिस्थितीत, संपूर्ण वैधता कालावधी दरम्यान युजर्स ना ७४० जीबी डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय दररोज १०० मेसेजेस देखील दिले जातील. युजर्सना जिओ अॅप्सची सदस्यता देखील दिली जात आहे. यामध्ये DISNEY + Hotstar चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. Jio चा २,३९९ रुपयांचा प्लान: हा कंपनीचा वार्षिक प्लान आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध असून प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. संपूर्ण वैधता कालावधी दरम्यान ७३० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात येत असून दररोज १०० मेसेजेस देखील दिले जात आहे . युजर्सना जिओ अॅप्सची सदस्यता देखील यात मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BCTwOh