Full Width(True/False)

नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचे! UAN सह Aadhaar लिंक करणे अनिवार्य? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नवी दिल्ली : तुम्ही जर नोकरी करत असाल, तर पगारामधून पीएफचे पैसे नक्कीच कापले जात असतील. त्यामुळे सध्या सह कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासंदर्भातीलच काही पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. च्या गाइडलाइन्सनुसार, UAN सह लिंक करणे गरजेचे आहे. वाचाः काय आहे UAN? UAN हे EPFO कडून प्रत्येक सदस्याला दिला जाणारा १२ आकडी नंबर आहे. या १२ आकडी नंबरनेच तुम्ही अकाउंट वापरू शकता. Aadhaar UAN Link Online: असे करा लिंक
  • सर्वात प्रथम EPF ची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2l8mi4m वर जा.
  • येथे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मॅनेज केस्शन दिसेल. येथे KYC पर्यायावर क्लिक करा. केवायसी पर्याय तुम्हाला मॅनेज सेक्शनमध्येच मिळेल.
  • आता एक पेज ओपन होईल, ज्यात UAN सोबत कोणती कागदपत्रं लिंक करायची आहेत, त्याची माहिती असेल.
  • येथे तुम्हाला आधार कार्ड हा पर्याय निवडायचा आहे. आधार कार्ड व इतर माहिती भरून सेव्हवर क्लिक करा.
  • यानंतर आधार UIDAI डेटाशी व्हेरिफाय होईल.
  • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर Aadhaar UAN शी लिंक होईल व तुम्हाला व्हेरिफाय लिहिलेले दिसेल.
एंप्लायरशिवाय आधार- UAN अपडेट कसे कराल? यासाठी तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिसच्या e-KYC Portal वर जावे लागेल. हे तुम्हाला EPFO वेबसाइटच्या होमपेजवर दिसेल. Aadhaar UAN लिंक आहे का नाही कसे पाहाल? Aadhaar - UAN लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला EPFO ची वेबसाइट https://ift.tt/2l8mi4m वर जावे लागेल. PF काढल्यानंतर UAN बंद होणार? नाही. पीएफ खात्यातून फंड्स काढल्यानंतर देखील UAN सुरू राहते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mhtsTv