नवी दिल्ली : इंस्टंट WhatsApp मध्ये यूजर्सच्या कामाचे अनेक शानदार फीचर्स उपलब्ध आहेत. या फीचर्समुळे यूजर्सचा चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला होतो. आम्ही तुम्हाला अशाच काही सिक्रेट फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. वाचा: हँड्स फ्री वॉइस नोट रेकॉर्ड: वर हँड्स फ्री ने तुम्ही वॉइस नोट रेकॉर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला WhatsApp चॅट बॉक्समध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला मायक्रोफोनचा पर्याय दिसेल. यावर टॅप करा. त्यानंतर तुम्ही वॉइस रेकॉर्ड करू शकता. शोधा जुने चॅट अनेकदा आपल्या जुन्या चॅटमधील काहीतरी महत्त्वाचे शोधायचे असते, मात्र शोधताना समस्या येत असते. त्यामुळे जर तुम्हाला एखादा मेसेज महत्त्वाचा वाटत असल्यास त्याला स्टार मार्क करू शकता. त्यामुळे तुम्हाला नंतर जास्त शोधायची गरज पडणार नाही. यासाठी चॅटवर लाँग प्रेस करा व त्यानंतर स्टार मार्कवर टॅप करा. या मेसेजला तुम्ही नंतर कधीही सहज वाचू शकता. फोनशिवाय राहा ऑनलाइन फोनवर ऑनलाइन राहून WhatsApp वर वारंवार मेसेज पाहणे अवघड आहे. अशावेळी तुम्ही WhatsApp वेबचा वापर करू शकता. यामुळे वारंवार फोन पाहावा लागणार नाही. प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन लपवा WhatsApp वर प्रायव्हसी महत्त्वाची आहे. तुमचा प्रोफाइल फोटो कोणी पाहिला हे समजणे अवघड आहे. सोबतच, तुम्ही लास्ट सीन देखील हाइड करू शकता. तुमचे स्टेट्स, प्रोफाइल फोटो कोण पाहणार हे देखील तुम्ही ठरवू शकता. मित्रांनी कधी वाचला तुमचा मेसेज ग्रुपवर पाठवलेला मेसेज कोणी व कधी पाहिला हे सहज लक्षात येत नाही. कोणत्याही मेसेजचे सीन स्टेट्स पाहण्यासाठी तुम्हाला त्यावर लाँग प्रेस करावे लागेल. येथून तुम्हाला कोणी मेसेज कधी पाहिला आहे, हे समजेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nLpH8B