Full Width(True/False)

WhatsApp वर लपवायचे आहे तुमचे खासगी चॅट? वापरा ही भन्नाट ट्रिक

नवी दिल्ली : ने गेल्या काही दिवसात अनेक नवीन अपडेट्स जारी केले आहेत. यामुळे यूजर्सला नवीन फीचर्स वापरता येत आहे. कंपनीच्या नवीन अपडेटमुळे यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेज लपवणे शक्य होणार आहे. ही ट्रिक काय आहे त्याबाबत जाणून घेऊया. वाचाः याआधी देखील व्हॉट्सअ‍ॅपवर खासगी चॅट लपवण्याचे फीचर होते. मात्र, नवीन मेसेज आल्यास ते चॅट पुन्हा मुख्य स्क्रीनवर दिसत असे. आता नवीन अपडेटमुळे खासगी चॅट अर्काइव्ह करता येईल व स्वतः अर्काइव्ह फोल्डरमधून चॅटला हटवणार नाही, तोपर्यंत तेथेच राहील. म्हणजेच चॅटशी संबंधित कोणतेही नॉटिफिकेशन पॉप-अप होणार नाही. या फीचरचा वापर करण्याआधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp अ‍ॅपला अपडेट करा. आता WhatsApp ओपन करून, ज्या चॅटला अर्काइव्ह करायचे आहे त्यावर लाँग प्रेस करा. त्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या पर्यायांपैकी अर्काइव्ह चॅट हा पर्याय निवडा. ते केल्यानंतर चॅट स्क्रीनवरून गायब होईल. आयफोन यूजर्ससाठी हे फीचर थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करते. आयफोनमध्ये ज्या चॅटला अर्काइव्ह करायचे आहे, त्या चॅटला डाव्या बाजूला स्लाइड करा. त्यानंतर समोर वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यातील अर्काइव्ह चॅट पर्याय निवडा. तुम्हाला जर चॅट पाहायचे असेल अथवा अनअर्काइव्ह करायचे असल्यास चॅटवरती तुम्हाला एक डब्ब्यासारखे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अर्काइव्ह फोल्डर दिसेल. तुम्ही फोल्डर उघडून रिप्लाय देऊ शकता किंवा लाँग प्रेस करून अनअर्काइव्ह पर्याय निवडू शकता. हे केल्याने चॅट पुन्हा मुख्य स्क्रीनवर दिसेल. दरम्यान, गेल्या काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅने अनेक फीचर्स रोल आउट केले आहे. यात यूपीआय पेमेंट्स, व्हिडिओ कॉलमध्ये स्वतःचा समावेश आणि डिसअपेरिंग मेसेजचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ANKpc4