Full Width(True/False)

घरबसल्या बदलू शकता Aadhaar Card वरील नाव-पत्ता, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक असून, अनेक ठिकाणी , पुरावा म्हणून आधार कार्ड द्यावे लागते. अशा स्थितीमध्ये आधार कार्डवरील माहिती अचूक असणे गरजेचे आहे. जर तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता अथवा जन्मतारीख चुकली असल्यास तुम्ही सहज दुरुस्त करू शकता. याबाबतची प्रोसेस जाणून घेऊया. वाचा: असे बदला कार्डवरील नाव
  1. सर्वात प्रथम .gov.in वेबसाइटवर जा.
  2. येथे होमपेजवरील MY Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
  3. आता Update Your Aadhaar सेक्शनमध्ये जा, येथे Update your Demographics Data Online चा पर्याय दिसेल.
  4. त्यावर क्लिक केल्यानंतर UIDAI ची सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलची वेबसाइट ssup.uidai.gov.in वर रिडायरेक्ट व्हाल.
  5. आता तुम्हाला १२ आकडी आधार नंबरने लॉग इन करावे लागेल. तसेच, रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
  6. ओटीपी टाकल्यानंतर नवीन पेज उघडेल. ज्यात तुमची माहिती द्यावी लागेल.
  7. आता तुम्हाला ज्यात बदल करायचा आहे नाव, जन्मतारीख अथवा पत्ता यापैकी एक सेक्शन निवडा व ती माहिती अपडेट करा.
  8. नाव बदलण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तुम्ही पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड अपलोड करू शकता.
  9. सर्व माहिती भरल्यानंतर मोबाइलवर एक ओटीपी येईल. याद्वारे तुम्ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करू शकता.
असे बदला Aadhaar कार्डवरील पत्ता
  1. आधारवरील पत्ता बदलण्यासाठी resident.uidai.gov.in वर जा. येथे Aadhaar Update Section मध्ये दिलेल्या 'Request Aadhaar Validation Letter' वर क्लिक करा.
  2. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल उघडेल.
  3. आता १२ आकडी आधार नंबरने लॉग इन करा.
  4. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल.
  5. ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करा.
  6. आता SRN द्वारे लॉग इन करून सबमिट करा.
  7. आता UIDAI च्या वेबसाइटवर 'Proceed to Update Address' क्लिक करून Update Address via Secret Code हा पर्याय निवडा.
  8. सिक्रेट कोड टाकल्यानंतर नवीन पत्ता तपासण्यासाठी सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवरील 'अपडेट रिक्वेस्ट नंबर'ला (URN) लिहून ठेवा.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kz84bc