मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. नुकताच कंगनाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने भारताला १९४७ झाली भीक मिळाली खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं, असं म्हटलं. कंगनाच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर रान पेटलं. अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं. दुसरीकडे कंगनाचा पद्मश्री परत घेण्याची मागणी होतेय. आता कंगनाने आपल्या त्या वक्तव्याचं समर्थन करत पद्मश्री परत करण्याची मागणी करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिलं, 'या मुलाखतीत हे स्पष्ट केलं होतं की १८५७ साली स्वातंत्र्यासाठी पहिली एकत्र लढाई लढली गेली. सोबतच सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्या बलिदानावरही भाष्य केलं गेलं. १८५७ चं मला माहितीये पण १९४७ साली कोणतं युद्ध लढलं गेलं त्याची मला माहिती नाही. १९४७ साली कोणतं युद्ध झालं हे कोणी मला सांगितलं तर मी माझा पद्मश्री परत करायला तयार आहे. मी माफीदेखील मागायला तयार आहे...' पुढे कंगनाने लिहिलं, 'मी राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर बनलेल्या चित्रपटात काम केलंय. १८५७ साली लढल्या गेलेल्या युद्धावर खूप संशोधन केलंय. तेव्हा लोकांमध्ये देशभक्ती प्रचंड वाढली होती. मग ही अचानक संपली कशी? गांधीजींनी भगतसिंगला मरण्यासाठी का सोडून दिलं? सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली? त्यांना गांधीजींचा पाठिंबा का मिळाला नाही? भारताची फाळणी एका इंग्रज अधिकाऱ्याने का केली? स्वातंत्र्य मिळाल्यावर आनंद व्यक्त करायच्या ऐवजी भारतीयांनी एकमेकांचे गळे का चिरले? मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.' कंगनाने पुढे म्हटलं, '२०१४ साली मिळालेल्या स्वातंत्र्यावरून माझं म्हणणं आहे की भारताला एक चेतना मिळाली . पहिल्यांदा लोक इंग्रजी येत नसल्यावर लाजत नाहीत. मेड इन इंडिया उत्पादनांना बाजारात किंमत आहे. या मुलाखतीत बोललेलं सगळं माफ आहे पण जे चोर आहेत त्यांना लागलेली आग कुणी नाही विझवू शकत.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ktk5yT