नवी दिल्ली : सर्वात महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. याचा वापर बँक खाते उघडण्यापासून ते कोणत्याही सरकारी कामासाठी होतो. आधार कार्डवरील जन्मतारीख, नाव व पत्ता कसा बदलायचा, हे तुम्हाला माहितीच असेल. मात्र तुम्ही आधारवरील फोटो देखील बदलू शकता. अनेकांना आपला आधारवरील फोटो आवडत नाही. असे लोकं सहज हा फोटो बदलू शकतात. वाचा: असा बदलू शकता आधार कार्डवरील फोटो
- आधारवरील फोटो बदलण्यासाठी सर्वात आधी ची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वरील Get Aadhaar सेक्शनमध्ये जा. येथे आधार एनरॉलमेंट फॉर्म अथवा करेक्शन/अपडेट फॉर्म डाउनलोड करा.
- हा फॉर्म भरून आधार पर्मेनेंट एनरॉलमेंट सेंटरवरील कर्मचाऱ्याला द्या.
- त्यानंतर तुम्हाला त्या कर्मचाऱ्याला बायोमेट्रिक डेटिल्स द्यावी लागेल. जर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा नसल्यास सेंटरवर देखील मिळेल.
- आता कर्मचारी तुमचा लाइव्ह फोटो क्लिक करेल.
- फोटो बदलण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.
- शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल, ज्यात अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल. या नंबरचा वापर तुम्ही स्टेट्स जाणून घेण्यासाठी करू शकता.
- आधारवरील फोटो अपडेटनंतर तुम्ही आधार कार्डला ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x4ipAX