जरी स्मार्टफोन मार्केटमध्ये महागड्या फोनचे वर्चस्व असले तरी परंतु बहुतेक विक्री केवळ बजेट विभागातच होते. मोबाईल डेटाच्या उपलब्धतेमुळे बजेट सेगमेंटमध्ये येणाऱ्या फोनची विक्री वाढली आहे. आज परवडणाऱ्या स्मार्टफोनमध्येही तुम्हाला जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स मिळतात, जे तुम्हाला महागड्या फोनमध्ये मिळतात. यामध्ये हाय रिझोल्युशन स्क्रीन, चांगला कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 4G कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे. या फोन्समध्ये तुम्हाला शानदार डिस्प्ले, प्रोसेसर, पॉवरफुल बॅटरीसह अनेक फीचर्स मिळतील. अशात, आम्ही तुम्हाला येथे काही स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही बाजारात १० हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये काही काळापूर्वी लाँच झालेल्या Realme अनेक स्मार्टफोनचा समावेश आहे. ही स्मार्टफोन ब्रँडची लिस्ट पाहा यातील सर्व फोन तुम्ही १० हजार रुपयांच्या खाली खरेदी करू शकता. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Moto E7 Plus
मोटोरोलाने काही दिवसांपूर्वीच Moto E7 Plus स्मार्टफोनला लाँच केले आहे. मोटोच्या या फोनमध्ये ६.५ इंच शानदार डिस्प्ले दिला आहे. याच्या रियरला ड्यूल कॅमेरा सेटअप असून, याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल आणि दुसरा २ मेगापिक्सल डीप सेंसर आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४६० SoC प्रोसेसरसह ४ जीबी रॅम मिळते. Moto E7 Plus स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे.
Infinix Smart 5A
इनफिनिक्स स्मार्ट ५ ए मध्ये ६.५ इंच एचडी+ एलसीडी आयपीएस इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशिया २०:९, स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.५ टक्के आहे, फोनमध्ये आय केअर मोड मिळते. यात १.८ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए२० प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. यामध्ये ८ मेगापिक्सल ड्यूल एआय आणि डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. यात ट्रिपल एलईडी फ्लॅश, पिक्रच मोड, ऑटो सीन डिटेक्शन, कस्टम बोकेह आणि एआय ३डी ब्यूटी सारखे मोड्स मिळतात. फोनची किंमत ६,९९९ रुपये आहे.
Poco C3
Poco C3 हा एक परवडणारा फोन आहे. फोनमध्ये ६.५३-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२०x१६०० पिक्सेल आहे. फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला ३ GB रॅम सह ३२ GB स्टोरेज मिळत आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे फोनचे स्टोरेज वाढवता येते. या फोन मध्ये तुम्हाला ५००० mAh ची मजबूत बॅटरी देखील मिळत आहे. सामान्य वापरामध्ये, फोन एका दिवसापेक्षा जास्त बॅटरी बॅकअप देतो. या फोनमध्ये तुम्हाला १३ मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा मिळत आहे.
Realme Narzo 10 A
पूर्वी लाँच केलेल्या Realme C3 चा अपग्रेड केलेला प्रकार आहे. कंपनीने Narzo 10A मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर जोडला आहे, जो पूर्वी लॉन्च झालेल्या Realme C3 मध्ये दिला गेला नव्हता. Realme Narzo 10A मध्ये MediaTek Helio G70 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो परवडणाऱ्या फोनमध्ये तुमचा गेमिंग अनुभव आणखी चांगला बनवतो. फोनची बॅटरी लाइफ चांगली आहे. हा फोन एका चार्जमध्ये २ दिवस सहज टिकतो. या फोनचा फक्त एक प्रकार बाजारात उपलब्ध आहे. फोन ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज सह खरेदी केला जाऊ शकतो. फोनची सुरवातीची किंमत ८,९९९ रुपये आहे.
Micromax in 1B
स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रेजॉलूशन दिला आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये रियर पॅनलवर AI क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्याासठी ५००० mAh बॅटरी तसेच १८ वॉटची चार्जिंग सपोर्ट दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनची (4GB RAM, 64GB) किंमत फ्लिपकार्टवर ९,७९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30CJ4c2