नवी दिल्ली : हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधारचा उपयोग तुम्ही अनेक सरकारी व खासगी कामांसाठी करू शकता. मात्र, आता आधार नंबरने थेट पेमेंट देखील करता येणार आहे. ज्यांच्याकडे फोन अथवा यूपीआय एड्रेस नाही, अशा यूजरला आधार कार्डचा वापर करून पैसे पाठवता येतील, असे ने म्हटले आहे. वाचा: करोना व्हायरस महामारीच्या काळात डिजिटल आर्थिक व्यवहार वाढले आहे. स्मार्टफोनचा वापर करून पैसे पाठवले जात आहे. अगदी छोटी वस्तू खरेदी केली तरीही दुकानात आपण थेट यूपीआयद्वारे पैसे पाठवतो. मात्र, अनेकांकडे स्मार्टफोन आणि यूपीआय एड्रेस नसल्याने व्यवहार करत येत नाही. यावर उपाय म्हणून यूआयडीएआयने भीम अॅपद्वारे आधार नंबरने पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. BHIM अॅप एक यूपीआय आधारित पेमेंट इंटरफेस आहे. याद्वारे मोबाइल नंबर आणि इतर माध्यमातून रियल टाइम फंड ट्रांसफर करता येतात. भीम अॅपद्वारे आधार नंबरचा वापर करून असे पाठवू शकता पैसे
- आधार नंबरचा वापर करून पैसे ट्रांसफर करण्यासाठी यूजर्सला १२ आकडी यूनिक आधार नंबर नमूद करावा लागेल. त्यानंतर व्हेरिफाय बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर सिस्टम आधार लिंकिंगला व्हेरिफाय करेल व यूजर्सचा एड्रेस जनरेट होईल. आता यूजर्स पैसे पाठवू शकतील.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cxGXZK