Full Width(True/False)

Airtel च्या 'या' प्रीपेड प्लानमध्ये मिळतोय रोज ५०० Mb डेली डेटा Free, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: भारती ही भारतातील सर्वात जुन्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. भारती Airtel ने आपल्या युजर्ससाठी एक चांगली ऑफर आणली असून कंपनीने आता २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानसह ५०० MB मोफत दैनिक डेटा ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. युजर्स Airtel Thanks अॅपद्वारे दररोज ०.५ GB किंवा ५०० MB डेटा रिडीम करू शकतात. महत्वाची बाब म्हणजे, ही विशेष ऑफर केवळ या विशेष प्रीपेड रिचार्ज प्लान्ससाठी वैध आहे. TelecomTalk च्या रिपोर्टनुसार, हा नवीन प्लान नसून Airtel ने सध्याच्या प्लानमध्येच काही नवीन फायदे जोडले आहेत. पाहा: ऑफर रिडीम करताना हे लक्षात ठेवा : एवढेच नाही तर, Airtel ने २४९ रुपयांच्या प्लानमध्ये आधी देत असलेले सर्व फायदे कायम ठेवले आहेत आणि अतिरिक्त ५०० MB मोफत डेटा जोडला आहे. हे या प्लानमध्ये दररोज १.५ GB मोफत डेटा देण्यात आला आहे आणि आता दैनिक एकूण डेटा मर्यादा २ GB करण्यात आली आहे. २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता : २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवस आहे. तर याआधी या प्लान मध्ये १.५ GB डेटा प्रतिदिन होता, जो एकूण डेटाच्या ४२ GB आहे. या प्लानचे युजर्स आता त्यांच्या २८ दिवसांत एकूण ५६ GB डेटापैकी दररोज २ GB डेटा वापरू शकतात. ५०० MB अतिरिक्त डेटा कसा रिडीम करायचा? ५०० एमबी अतिरिक्त मोफत डेटा वापरण्यासाठी युजर्सना त्यांच्या Airtel सिम कार्डमध्ये २४९ रुपयांचा पॅक जोडावा लागेल. यानंतर तुम्हाला Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल. Airtel Thanks अॅप उघडा आणि रिडीम फ्री ५०० MB डेटा पर्याय निवडा. युजर्सना पॅकेजनंतर २८ दिवसांपर्यंत दररोज डेटा रिडीम करण्याची ही प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. याशिवाय एअरटेल थँक्स अॅपवरून तुम्ही या प्लानद्वारे रिडीम करू शकणार्‍या इतर फायद्यांमध्ये एक महिना Amazon प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन ट्रायल, एक वर्ष शॉ अकादमी, अपोलो 24|7 सर्कल, मोफत हॅलो ट्यून्स सबस्क्रिप्शन, विंक म्युझिक यांचा समावेश आहे. FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. Airtel स्वतः २१९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज १ GB डेटा ऑफर करतअसून आता २४९ रुपयांच्या पॅकसह २ GB दैनिक डेटा ऑफर करत आहे. यामुळे अधिकाधिक ग्राहक २४९ रुपयांच्या पॅकची निवड करतील अशी अपेक्षा आहे. पाहा: पाहा: पाहा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nnMVTj