Full Width(True/False)

Samsung-Apple ला जोरदार टक्कर देणार Realme, लाँच करणार ६० हजारांपेक्षा महागडा स्मार्टफोन

नवी दिल्ली : फ्लॅगशिप स्मार्टफोन ब्रँड म्हणून , आणि Vivo सारख्या कंपन्यांना ओळखले जाते. मात्र, आता या यादीत चे नाव देखील जोडले जाण्याची शक्यता आहे. लवकरच एडवांस्ड हाय-एंड स्मार्टफोन बाजारात सादर करू शकते. वाचा: Realme चे सीईओ Sky Li यांनी याबाबत खुलासा केला आहे. आतापर्यंत रियलमी बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये जबरदस्त फोन्स सादर करत आहे. आता कंपनी रेंज वाढविण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, Realme ने सीरिज अंतर्गत भारतासह जगभरातील फ्लॅगशिप स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आता रियलमी पूर्णपणे फ्लॅगशिप स्मार्टफोन मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. रियलमी लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. रियलमीचे सीईओ आणि संस्थापकांनी कंपनीच्या या प्लानबाबत माहिती दिली आहे. Realme चा दावा आहे की, ते अल्ट्रा-प्रीमियम सेगमेंटमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन मार्केटमध्ये दिग्गज कंपन्यांना टक्कर देणार आहे. रियलमी लवकरच ८०० डॉलर्सपेक्षा (जवळपास ६० हजार रुपये) अधिक किंमतीचे फोन लाँच करणार आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोनबद्दल सांगायचे तर रियलमीच्या पोर्टफोलियोमध्ये सध्या Realme GT Neo 2 उपलब्ध आहे. कंपनी लवकरच Samsung, Apple आणि Google ला टक्कर देण्यासाठी शानदार स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. रियलमीकडून २०० मेगापिक्सल कॅमेरा फोन लाँच करण्याची तयारी आहे. आता कंपनी अंडर डिस्प्ले कॅमेरा फोन लाँच करणार असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याचा अर्थ कंपनी फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ox0oam