नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सह अनेक टेलिकॉम कंपन्या नवीन यूजर्संना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लान आणत असते. काही दिवसांपूर्वी इंडियन टेलिकॉम दिग्गज जिओने विना डेली लिमिट सोबत येणारा प्लान आणला होता. जो यूजर्संना खूपच पसंत पडला होता. हे पाहून एअरटेलनेही जिओला जबरदस्त टक्कर देण्यासाठी कोणताही डेली डेटा लिमिटचा प्लान लाँच केला होता. या प्लानद्वारे दिवसभरात खूप वापर करू शकता. कंपनी अनेक प्लान ऑफर करते परंतु, यात एक आहे की जे सर्व बेनिफिट्स सोबत येते. याची किंमत ४५६ रुपये आहे. जाणून घ्या या प्लान संबंधी. विना डेली लिमिट सोबत ५० जीबी डेटा एअरटेलच्या ४५६ रुपयाच्या या प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग सोबत सर्व अतिरिक्त बेनिफिट्स सुद्धा मिळते. या प्लानमध्ये यूजर्संना विना डेली लिमिट ५० जीबी डेटा मिळतो. त्यासोबतच ६० दिवसाची वैधता सोबत अनलिमिटेड कॉल्स आणि रोज 100SMS चा फायदा मिळतो. या प्लान अंतर्गत यूजर्संना ५० जीबी डेटा लिमिट नंतर 50p/MB या दराने चार्ज केला जातो. अतिरिक्त बेनिफिट्स मिळतात या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये डेटा आणि कॉलिंग सोबत प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन (Amazon Prime Video Mobile Edition) चे ३० दिवसाचे फ्री ट्रायल मिळते. याशिवाय, ग्राहकांना Airtel Xstream प्रीमियम, फ्री हेलोट्यून्सचा अॅक्सेस, ३ महिन्यासाठी Apollo 24|7 Circle, फ्री Wynk Music, १ वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag वर १०० रुपयाचा कॅशबॅक मिळतो. Airtel चा २९९ रुपयाचा प्रीपेड प्लान यासोबतच, एअरटेल नो डेली लिमिट सोबतचा आणखी एक स्वस्त प्लान आहे. ज्याची किंमत २९९ रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना विना डेली लिमिट ३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. या प्लान अंतर्गत यूजर्संना ३० जीबी डेटा लिमिटनंतर 50p/MB या दराने चार्ज केला जातो. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसांचे फ्री ट्रायल, एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियमचे अॅक्सेस आणि फ्री हेलोट्यून्सचा अॅक्सेसचा समावेश आहे. नो डेली लिमिटसोबत १४९८ रुपयाचा प्लान एअरटेलचा वर्षभर चालणारा प्लान असून याची किंमत १४९८ रुपये आहे. पूर्ण ३६५ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये कंपनी विना डेली लिमिट शिवाय, २४ जीबी डेटा ऑफर करते. याशिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल आणि ३६०० एसएमएस दिले जातात. एडिशनल बेनिफिट्स मध्ये या प्लानमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसाचे फ्री ट्रायल सुद्धा मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wyOhxg