नवी दिल्लीः Airtel आणि Vodafone-Idea कडे असे अनेक प्लान आहेत. जे फ्री ओटीटी प्लॅटफॉर्म देण्यासोबत डेटा सुद्धा उपलब्ध करतात. हा प्लान खास त्या लोकांसाठी आहे. ज्यांना मोबाइलवर ओटीटी वर मूव्ही आणि वेब सीरीज पाहायला आवडतात. या प्लान्समध्ये जास्त डेटा सोबत फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन सुद्धा मिळतात. या प्लान्सची वैधता एका महिन्यापासून सुरू होते. यासोबतच ३६५ दिवसाची वैधतेचा सुद्धा प्लान मिळतो. एअरटेल आणि वोडाफोन प्लान सोबत अमेझॉन प्राइम आणि एअरटेल डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. जाणून घ्या डिटेल्स. एअरटेलचा ३४९ रुपयाचा जबरदस्त प्लान तुम्ही जर एअरटेलचे यूजर असाल तसेच कमी किंमतीचे प्लान सोबत ओटीटी सब्सक्रिप्शन घ्यायचे असेल तर एअरटेलकडे ३४९ रुपयाचा जबरदस्त प्लान आहे. हा एअरटेलचा सर्वात पॉप्यूलर प्लान आहे. या प्लान सोबत २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएसची सुविधा वैगरे मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये अमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. एअरटेलचा ३९८ रुपयाचा प्लान एअरटेलच्या या प्लान सोबत यूजर्संना २८ दिवसांपर्यंत रोज ३ जीबी डेटा दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएस दिल्या जाणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला अमेझॉन प्राइमची मेंबरशीप सुद्धा मिळते. एअरटेलचा २७९८ रुपयाचा प्लान एअरटेलचा २७९८ रुपयचा प्लान हा ३६५ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएस सुविधा मिळते. अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये अमेझॉन प्राइमचे फ्री ट्रायल तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. वोडाफोन आयडियाचा ५०१ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा ५०१ रुपयाचा प्लान शानदार आहे. यात यूजर्संना रोज ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग सोबत बिंज ऑल नाइट बेनिफिट सुद्धा मिळेल. कंपनी या प्लानमध्य १६ जीबी एक्स्ट्रा डेटा सोबत एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे अॅक्सेस देते. ९०१ रुपयाचा वोडाफोन आयडियाचा प्लान वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयाचा प्लान ८४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये यूजरला रोज ३ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत बिंज ऑल नाइट बेनिफिट मिळते. तसेच प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे एक वर्षासाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Duue5O